Join us

कुर्ता असो की पंजाबी ड्रेस मागच्या गळ्याचे १० खास डिजाईन्स शिवा; सिंपल, सुंदर-मॉडर्न लूक येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:39 IST

1 / 10
डेलीवेअर असो किंवा कोणताही खास प्रसंग एथनिक वेअर सगळ्यात जास्त घातले जातात. कारण या ड्रेसमध्ये आरामदायक वाटते. दिसायलाही सुंदर, स्टायलिश दिसते. आजकाल मार्केटमध्ये रेडीमेड सूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Latest Back Neck Designs For Suit And Kurti)
2 / 10
महिला टेलर आणि बुटीकमधून सूट स्टिच करणं पसंत करतात. कारण रेडीमेड ड्रेसपेक्षा शिवून घेतलेले ड्रेस जास्त आकर्षक वाटतात. ड्रेस शिवताना मागचा गळा कसा शिवावा याचे काही टाईप्स पाहूया. (Latest Fancy Back Neck Blouse Designs)
3 / 10
सूट किंवा कुर्त्याला फॅन्सी लूक देण्यासाठी तुम्ही नेट, हार्ट शेप डिजाईन्स बनवू शकता. डेली वेअर सूट असो किंवा फॅन्सी ड्रेस हे ,सूट अगदी सुंदर उठून दिसतील.
4 / 10
ड्रेसचा मागचा गळा ओव्हल शेपचा असेल तर ते ही सुंदर दिसते. तुम्ही सूटवर खास एंब्रॉयडरी वर्क किंवा स्टायलिश डिजाईन्स ट्राय करू शकता.
5 / 10
सिंगल डोरीची डिजाईन तु्म्ही अनेकदा शिवून घेतली असेल पण डबल डोरी नेक डिजाईनसुद्धा ट्राय करायला हवी. यामुळे तुमच्या कपड्यांना डिजायनर लूक येईल. याशिवाय मॅचिंग हेवी स्टिच लटकनमुळे तुमचा लूक अधिकच खुलेल.
6 / 10
जर तुम्हाला एखाद्या खास प्रसंगासाठी ड्रेस शिवायचा असेल तर तुम्ही डिजायनर ट्रेंडी लूक मिळवण्यासाठी बॅकेलस क्रिस क्रॉस शेप नेक डिजाईन्स शिवू शकता.
7 / 10
हार्ट शेप आणि पायपिंगचा गळा नेहमी सुंदर दिसतो.
8 / 10
पाठीला डीप व्ही नेक शिवून तुम्ही त्यावर नेट लावून घेऊ शकता किंवा नॉड्स शिवू शकता.
9 / 10
पाठीमागच्या गळा पानाच्या आकाराचा शिवून बो लावू शकता.
10 / 10
जर तुम्हाला ओपन गळा आवडत नसेल तर ही डिजाईन तुमच्यासाठी उत्तम आहे.
टॅग्स : खरेदीफॅशन