1 / 12सध्या पैठणीमध्ये कलांजली पैठणी ही खूपच ट्रेंडीग आहे. लग्नसराईत आणि सणासुदीच्या काळात कलांजली पैठणीला प्रचंड मागणी आहे. (Latest Collection Of Kalanjali Paithani)2 / 12 ही साडी अत्यंत मऊ आणि उच्च दर्जाच्या प्रिमियम कापडापासून तयार केली जाते. ज्यामुळे नेसल्यानंतर फुगत नाही. अंगाला चापून चोपून बसते. (Kalanjali Paithani in 12 Colors)3 / 12या साडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यासोबत मिळणारे हॅण्डवर्क केलेले आरी वर्कचे ब्लाऊज पीस. हे ब्लाऊज या साडीला अधिकच आकर्षक बनवते. (Kalanjali Paithani With Hand Work Blouse)4 / 12ब्लाऊजवर अतिशय सुबक आणि हातानं केलेले कलाकुसरीचे काम पाहायला मिळते. पूर्ण साडीवर सुंदर आणि लहान आकाराच्या नाजूक बुट्ट्यांचे डिझाईन्स असते.5 / 12ही साडी साधारण १० ते १२ वेगवेगळ्या गडद आणि पेस्टल रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. सॉफ्ट क्लालिटीमुळे ही साडी नेसायला अत्यंत हलकी आणि दिवसभर सांभाळायला सोपी असते.6 / 12पैठणीची पारंपारीक लूक आणि मॉडर्न आरी वर्क यामुळे ही साडी एक वेगळाच रूबाब देते. साडीचा पदर भरगच्च विणकाम असलेला आणि रिच लूक देणारा असतो.7 / 12लग्नकार्य, डोहाळे जेवण किंवा मोठ्या पूजा अर्चांसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. यात तुम्हाला आरामदायी वाटण्यासोबतच एक अतिशय स्टायलिश आणि रॉयल लूक मिळतो.8 / 12या साडीला पारंपारीक पद्धतीची रुंद आणि नाजूक विणकाम केलेली काठ असते जी साडीच्या सौंदर्यात भर घालते.9 / 12आरी वर्कचे ब्लाऊज कस्टमाईज करून शिवल्यावर साडीला एक डिझाननर टच मिळतो जो सर्वसाधारण पैठणीपेक्षा वेगळा ठरतो.10 / 12प्रिमियम क्वालिटी असूनही ही साडी सर्व सामान्यांच्या बेजटमध्ये आणि व्हॅल्यू फॉर मनी मानली जाते. 11 / 12नातेवाईकांना गिफ्ट म्हणऊन देण्यासाठी तसंच लग्नकार्यात नेसण्याठी उत्तम पर्याय आहे.12 / 12या साडीत तुम्हाला 12 सुंदर रंग उपलब्ध होतील आणि किंमत 2000 ते 3000 या रेंजमध्ये आहे. (Image Credit - Vardaan Paithani, Instagram)