By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 18:54 IST
1 / 12सध्याच्या फॅशनमध्ये लोकप्रिय असलेला इंडो-वेस्टर्न किंवा एथनिक एलिगन्स या प्रकारातील या खादी कॉटनच्या साड्या आहेत. ( Khadi Cotton Saree 12 Patterns)2 / 12या साड्या शुद्ध सुती किंवा लिनन कॉटन या प्रकारातील असून त्या दिसायला अत्यंत साध्या पण मनमोहक असतात. (Khadi Cotton Saree With Designer Blouse)3 / 12या साड्यांमध्ये सहसा पेस्टल रंग किंवा नैसर्गिक रंग वापरेला जातात ज्यातून एक शांत आणि सौम्य लूक मिळतो.4 / 12साडी साधी असताना त्यावर कलमकारी किंवा ब्लॉक प्रिंट असलेले ब्लाऊज उठून दिसते.5 / 12साध्या साडीवर गडद रंगाचे किंवा मोठ्या फुलांच्या डिझाईन्सचे प्रिंटेड ब्लाऊज घातल्यामुळे एक सुंदर कॉन्ट्रास्ट लूक मिळतो.6 / 12 अशा प्रिंट्समध्ये भारतीय हस्तकलेचा वापर केलेला असतो जो पारंपारीक आणि अधुनिक अशा दोन्ही पद्धतींनी सजवता येतो.7 / 12कॉटन फॅब्रिक असल्यामुळे या साड्या दिवसभर नेसण्यासाठी अतिशय आरामदायक आणि हलक्या असतात. 8 / 12हे कॉम्बिनशन्स ऑफिसवेअर,छोटे कार्यक्रम किंवा औपचारीक मिटिंग्ससाठी उत्तम पर्याय ठरतात.9 / 12यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी घातल्यास साडीचा लूक अधिक खुलून येतो. प्रिंटेंड ब्लाऊज शिवताना हाय नेक, बोट नेक किंवा कोपरापर्यंतच्या बाह्या ठेवल्यास त्याला अधिक क्लासी लूक येतो. 10 / 12योग्य काळजी घेतल्यास या साड्या आणि त्यांचे प्रिंट्स अनेक वर्ष टिकतात आणि त्यांची फॅशन कधीही जुनी होत नाही.11 / 12प्रत्येक प्रिंटेड ब्लाऊजची डिझाईन वेगळी असल्यानं एकाच साडीवर वेगवेगळे ब्लाऊज वापरून तुम्ही दरवेळी नवीन लूक मिळवू शकता.12 / 12सिंपल साडी आणि हेवी प्रिंटेड ब्लाऊज हे समीकरण साधेपणातलं सौंदर्य दर्शवते.