Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लग्नसराईसाठी कांजीवरम सिल्क साड्यांचे खास कलेक्शन; ८ रंग, कमी बजेटमध्ये मिळेल सुंदर साडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 00:56 IST

1 / 7
कांजीवरम सिल्क साड्या सध्या बऱ्याच ट्रेंडमध्ये आहे. या साड्यांचे काही खास पॅटर्न्स पाहूया. (Kanjeevaram silk sarees collection)
2 / 7
कांजीवरम सिल्क साड्या या तामिळनाडू राज्यातील कांचीपूरम या शहरात तयार केल्या जातात, म्हणूनच त्यांना 'कांजीवरम' असे नाव पडले आहे. (Kanjivaram Saree 8 Patterns)
3 / 7
या साड्या शुद्ध तुती रेशमापासून बनवल्या जातात. यात रेशमाचे धागे एकत्र गुंफले असल्याने या साड्या अत्यंत जड आणि टिकाऊ असतात.
4 / 7
कांजीवरम साड्यांचे मुख्य आकर्षण म्हणजे त्यावरील सोन्या-चांदीचे जरीकाम. रेशमी धाग्यासोबत चांदीचा तार आणि त्यावर सोन्याचा मुलामा देऊन ही जर तयार केली जाते.
5 / 7
या साड्यांवर प्रामुख्याने मंदिर, मोर, पोपट, फुले आणि पौराणिक कथांमधील प्रसंगांची सुंदर नक्षी कोरलेली असते.
6 / 7
या साड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे साडीचा पदर आणि काठ हे साडीच्या मुख्य भागापेक्षा वेगळ्या रंगाचे असतात. हे दोन्ही भाग स्वतंत्रपणे विणून नंतर अतिशय कौशल्याने जोडले जातात. या साड्यांना भारताचा 'भौगोलिक मानांकन' दर्जा मिळाला असून, त्यांना 'साड्यांची राणी' असेही संबोधले जाते.
7 / 7
भारतीय संस्कृतीत, विशेषतः दक्षिण भारतात, लग्नसमारंभ आणि धार्मिक उत्सवांसाठी कांजीवरम साडीला पहिली पसंती दिली जाते. उच्च दर्जाचे रेशीम आणि खरी जर वापरली जात असल्याने या साड्या पिढ्यानपिढ्या टिकतात आणि एक मौल्यवान वारसा मानल्या जातात.
टॅग्स : खरेदीफॅशनस्टायलिंग टिप्स