लग्नाच्या सिजनसाठी घ्या खास कलांजली पैठणी; ८ रंग, आरी वर्क ब्लाऊजसोबत मिळेल सुंदर पैठणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:59 IST
1 / 10लग्नसराईसाठी खास मुहूर्तावर प्रत्येक वधूला आणि तिच्या नातेवाईकांना पारंपारीक आणि आकर्षक पोशाख हवा असतो. अशावेळी महाराष्ट्राची शान असलेली पैठणी साडी हा एक उत्तम आणि अनिवार्य पर्याय ठरतो. (Kalanjali Paithani Designs)2 / 10कलांजली खास लग्नसमारंभासाठी उत्कृष्ट दर्जाच्या पैठणी साड्यांचा संग्रह घेऊन आली आहे. या साड्यांचे विणकाम अतिशय बारीक आणि कलात्मक असते. ज्यामुळे त्यांना एक भव्य आणि शाही रूप प्राप्त होते.3 / 10कलांजलीची पैठणी विकत घेतल्यास तुम्हाला फक्त साडीच नाही तर त्यासोबत खास डिझाईन केलेलं आरी वर्कचं ब्लाऊज पीसही मिळेल. 4 / 10या पैठण्यांसाठी वापरलेले रेशीम उच्च प्रतीचे असते आणि विणकाम मराठमोळ्या परंपरेला जपून केलेले असते.5 / 10विविध रंगाचे आणि डिजाईन्सचे पर्याय आवडीनुसार हिरवा, पिवळा, जांभळा अशा अनेक आकर्षक रंगांमध्ये पैठणी उपलब्ध आहेत.6 / 10 पैठणीचा पदर हा त्याचे मुख्य आकर्षण असते. ज्यावर मोर, पोपट, कमळ किंवा पारंपारीक नक्षीकाम केलेले असते.7 / 10कलांजली पैठणीसोबत मिळणारे आरी वर्क केलेले ब्लाऊज पीीस हे संपूर्ण लूकला एक परीपूर्ण आणि स्टायलिश फिनिशिंग देते.8 / 10 आरी वर्क हातानं केली जाणारी एक सुंदर कला आहे. ज्यामुळे ब्लाऊजला एक खास आणि कस्टमाईज्ड लूक मिळतो.9 / 10 हे ब्लाऊज पीस साडीच्या रंगाशी जुळणारे किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचे असू शकते जे लग्नाच्या वधुसाठी एक अद्वितीय आणि संस्मरणीय पोशाख बनवते.10 / 10कलांजली पैठणी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये २००० रूपयांपासून ते ५००० रूपयांपर्यंतच्या रेंजमध्ये मिळेल.