Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लग्नात नेसण्यासाठी घ्या कडीयाल पैठणी; १० कलर कॉम्बिनेशन्स, प्रिमियम वर्कचं ब्लाऊज फ्री....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:55 IST

1 / 10
सध्या साडी मार्केटमध्ये कडीयाल पैठणी आणि त्यावर केलेले आरी वर्क ब्लाऊज हे समीकरण प्रचंड लोकप्रिय होत आहे. (Kadiyal Paithani With Aari Work Blouse)
2 / 10
कडीयाल पैठणीमध्ये साडीचा काठ आणि साडीचा मुख्य भाग वेगवेगळ्या रंगात असतो त्यामुळे साडी उठून दिसते. (10 Colours Of Kadiyal Paithani)
3 / 10
ही पैठणी अत्यंत पारंपारीक असली तरी आरी व्रकच्या ब्लाऊजमुळे तिला एक मॉडर्न आणि डिझायनर टच मिळतो.
4 / 10
यात प्रामुख्यानं राणी कलर, पोपटी काठ, नेव्ही ब्लू-लाल काठ आणि जांभळा, हिरवा काठ अशी विलोभनीय रंगसंगती यात पाहायाला मिळते.
5 / 10
या साड्या सिल्क आणि सेमी सिल्क पॅटर्नमध्ये उपलब्ध असून त्या नेसायला हलक्या आणि दिसायला रॉयल असतात.
6 / 10
लग्नकार्य, मुंज किंवा कोणत्याही मोठ्या सणासाठी हा साडीचा प्रकार सध्या महिलांची पहिली पसंती ठरत आहे.
7 / 10
या साड्या पॅटर्ननुसार विविध किंमतीत उपलब्ध आहेत. आरी वर्क ब्लाऊज पीस साडीसोबतच सेट स्वरूपात मिळतो. ज्यामुळे ग्राहकांचा ब्लाज डिझाईन्स निवडण्याचा वेळ वाचतो.
8 / 10
कडीयाल पैठणी आणि आरी वर्क ब्लाऊज हे कॉम्बिनेशन सध्याच्या फॅशन वर्ल्डमध्ये एक रॉयल स्टेटमेट बनलं आहे.
9 / 10
आरी वर्कच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला मोराच्या डिझाईन्स सहज मिळतील. ज्यामुळे शाही लूक येईल.
10 / 10
जर तुम्हाला तेच ते डार्क रंग नको असतील तर तुम्ही अशी लाईट शेडची साडी निवडू शकता.
टॅग्स : खरेदीफॅशन