By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:10 IST
1 / 10इरकल आणि पैठणी या दोन्ही महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगातील अत्यंत समृद्ध परंपरा आहेत. तांत्रिकदृष्ट्या इरकल आणि पैठणी हे दोन स्वतंत्र प्रकार आहेत. परंतु अनेकदा लोक त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे त्यांना एकत्रितपणे ओळखतात. (Irkal Paithni For Wedding Season)2 / 10ही साडी प्रामुख्यानं सुती किंवा सुत रेशमाच्या मिश्रणातून तयार केली जाते. जी दैनंदिन वापरासाठी अतिशय सुटसुटीत असते. (10 Beautiful Colours Of Irkal Saree Trending Irkal Paithani)3 / 10इरकल साडीची सर्वात मोठी ओळख म्हणजे तिचा कोंडी पल्लू जो एक विशिष्ट विणकाम पद्धत वापरून जोडलेला असतो.4 / 10ही साडी महाराष्ट्राची शान असून तिचे मूळ पैठण औरंगाबाद येथील आहे. पैठणी ही शुद्ध रेशीम आणि सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीचा वापर करून विणली जाणारी अतिशय महागडी शाही साडी आहे.5 / 10पैठणीवरील मोर, पोपट आणि फुलांची नक्षी हि तिची जागतिक ओळख आहे.6 / 10 इरकल पैठणी असे जे संबोधन वापरले जाते ते सहसा इरकल साडीच्या शरीराचा भाग आणि त्यावर पैठणी जरीचा पदर अशा स्वरूपात अधुनिक दिसते.7 / 10 अशा साड्यांमध्ये इरकलच्या टिकाऊपणाचा आणि पैठणीच्या भव्यतेचा सुंदर संगम पाहायला मिळतो.8 / 10सण-समारंभात या दोन्ही प्रकारांना आजही महिलांची पहिली पसंती असते. १५०० ते २५०० च्या रेंजमध्ये तुम्हाला या साड्या मिळतील.9 / 10लग्नसराईसाठी ही साडी उत्तम पर्याय आहे. तुम्ही कोणत्याही खास प्रसंगांसाठी इरकल साडी नेसू शकता.10 / 10या साड्यांमध्ये तुम्हाला १५ ते १६ रंगांचे कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. जे तुम्ही लग्नसराईसाठी विकत घेऊ शकता.