Join us

प्युअर पैठणीची पारख कशी कराल? ८ टिप्स, शुद्ध राजेशाही पैठणीची ओळख होईल-सुंदर दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 12:09 IST

1 / 8
अस्सल पैठणी (Paithani) हातमागावर विणलेली असते. साडीचा पदर आणि बुट्या मागच्या बाजूला पाहिल्यास विणकाम सुबक आणि धाहे कापलेले दिसतात. (8 tips to identify pure royal Paithani)
2 / 8
शुद्ध रेशीम पैठणीत दोन वेगवेगळ्या रंगाचे धागे वापरल्यानं प्रकाशानं साडीची छटा बदलल्यासारखी दिसते.
3 / 8
उच्च दर्जाची रेशीम आणि शुद्ध, उच्च गुणवत्तेची धातुची झरी वापरलेली असते. जी टिकाऊ आणि चमकदार असते.
4 / 8
साडीवरील बुट्ट्यांचे नक्षीकाम पुढे आणि मागे दोन्ही बाजूंनी जवळपास सारखेच असते.
5 / 8
पदरवर मोर, पोपट, कमळ यांसारखे पारंपारीक कलात्मक डिजाईन्स अतिशय बारीक विणलेले असतात.
6 / 8
प्युअर सिल्क पैठणीचा पोत मऊ असतो आणि वजनाने ती थोडी जड जाणवते.
7 / 8
शुद्ध रेशिम आणि हातमागावर विणलेली असल्याने तिची किंमत मशीनवर केलेल्या साडीपेक्षा लक्षणीयरित्या जास्त असते.
8 / 8
पैठण आणि येवला या मूळ केंद्रातून खरेदी केल्यास शुद्धतेची खात्री जास्त असते.
टॅग्स : खरेदीफॅशन