By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 16:53 IST
1 / 8कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र घालावं याबाबत बऱ्याच महिला कन्फ्युज असतात. कारण पारंपारीक सोन्याचे मंगळसूत्र सर्वच आऊटफिट किंवा साड्यांवर सूट होतात असं नाही. मंगळसूत्र निवडीच्या काही स्टायलिंग टिप्स पाहा. (How To Choose Perfect Mangalsutra For Different Types Of Sarees)2 / 8जर तुम्ही खणाची साडी नेसणार असाल तर ऑक्सिडाईज मंगळसूत्र एक एलिगंट लूक देईल.3 / 8जर तुम्ही काठ पदराची किंवा सिल्कची साडी नेसणार असाल सोन्याचं मंगळसूत्र तसंच मोठं मंगळसूत्र उत्तम दिसेल.4 / 8पार्टी वेअरसाठीवर गोल्डन मंगळसूत्र चांगले दिसत नाही अशावेळी तुम्ही डायमंड मंगळसूत्राची निवड करू शकता. 5 / 8ऑर्गेंझा साडीवरही डायमंड मंगळसूत्र शोभून दिसतं. काळेमणी आणि ऑर्गेंझा साडी तुमचा लूक अधिक खुलवेल.6 / 8कॉटन किंवा लिनन साडी असेल आणि साध्या कार्यक्रमाला किंवा ऑफिसला जात असाल तर एकसरी नाजूक मंगळसूत्र उठून दिसेल.7 / 8नऊवारी साडीवर मोठ्या पेंडंटचे लांब मंगळसूत्र शोभून दिसते. यावर तुम्ही ठुशी मंगळसूत्रही घालू शकता. 8 / 8लग्नसमारंभांसाठी जड मंगळसूत्र तर दैनंदिन कामकाज किंवा ऑफिसवेअरसाठी नाजूक मंगळसूत्र निवडा.