1 / 7आषाढी अमावस्या म्हणजेच दीपअमावस्या आणि गुरुपुष्यामृत (Gurupushyamrut and Deep Amavasya 2025) हे दोन्ही योग एकाच दिवशी आले आहेत. आता सोनं तर खूप महाग झालेलं आहेच, पण तरीही गुरुपुष्यामृत योग साधून तुम्हाला १- २ ग्रॅम वजनाच्या एखाद्या लाईटवेट दागिन्याची खरेदी करायची असेल तर या काही दागिन्यांचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.(light weight gold jewellery shopping at low price)2 / 7पहिला पर्याय म्हणजे अंगठी. दोन ग्रॅम वजनात कित्येक प्रकारचं वेगवेगळं डिझाईन असणाऱ्या अंगठी मिळू शकतात.3 / 7सणावाराला नथ घातली जातेच. शिवाय ती अगदी कमी वजनात येते. त्यामुळे नथ घेण्याचा विचारही तुम्ही करू शकता.4 / 7हल्ली पारंपरिक वेशभुषा केल्यानंतर त्यावर घालायला कानात बुगडी हवीच. बुगड्यांचेही खूप सुंदर आणि कमी वजनात मिळणारे प्रकार बाजारात आलेले आहे. 5 / 7कानात घालण्याचे वेल किंवा साखळ्याही कमी वजनात मिळू शकतात. 6 / 7रोजच्या वापरासाठी असणाऱ्या नाजुक कानातल्यांचेही अनेक सुंदर डिझाईन्स कमी वजनात आणि कमी किमतीत मिळू शकतात.7 / 7त्याचप्रमाणे नाकात घालण्याची नाजूक मोरणीही तुम्ही घेऊ शकता. ती तर खूपच कमी किमतीत येते शिवाय तुमचं सौंदर्यही खुलवते.