Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Gudi Padwa 2026: गुढी पाडव्यासाठी खास पैठणी ड्रेसेस; १० पॅटर्न- कपाटातल्या जुन्या पैठणीला नवा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:53 IST

1 / 10
या गुढी पाडव्याला (Gudi Padwa 2026) तुम्ही साडी न नेसता अशा प्रकारचे पैठणीचे ड्रेसेस घालू शकता. पैठणी साडी ही महाराष्ट्राची शान मानली जाते यात वैभवशाली परंपरेला अधुनिक रूप देण्यासाठी पैठणी ड्रेसेस सध्या खूपच लोकप्रिय होत आहेत. (Gudi Padwa Special Paithani Dresses 10 Amazing Patterns)
2 / 10
पैठणी साडीच्या कापडापासून बनवलेले ड्रेसेस पारंपारीक कारागिरी आणि अधुनिक फॅशन यांचा एक सुंदर मिलाफ आहेत.
3 / 10
हे ड्रेसेस मुख्यत्वे शुद्ध रेशीम आणि जरतारी काठ वापरून तयार केले जाता. ज्यामुळे त्यांना एक राजेशाही लूक मिळतो.
4 / 10
कपाटात असलेल्या जुन्या आईच्या किंवा आजीच्या पैठणीचा तुम्ही सुंदर असा ड्रेस शिवू शकता.
5 / 10
यावर प्रामुख्यानं मोर, पोपट, कमळ आणि वेलींची सुंदर विणलेली नक्षी तुम्हाला पाहायला मिळेल.
6 / 10
अशा प्रकारचा पॅटर्न शिवल्यास तुम्हाला लग्नसराईतही हा ड्रेस घालता येईल. या ड्रेससाठी तुम्हाला ९०० ते २००० रूपयांपर्यंत शिलाई लागू शकते.
7 / 10
तुम्हाला सिंपल सूट किंवा पंजाबी ड्रेस टाईप पॅटर्न शिवून हवं असेल तर असा ड्रेस शिवू शकता.
8 / 10
आजकाल पैठणी जॅकेट्स बरेच मागणीत आहेत. तुम्ही पैठणी जॅकेट कोणत्याही साध्या कुर्त्यावरही घालू शकता.
9 / 10
पैठणीचा कुर्ता आणि पॅन्ट शिवून तुम्ही त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाची ओढणीसुद्धा घेऊ शकता.
10 / 10
पैठणीचे हे सुंदर ड्रेसेस तुम्हाला कमीत कमी खर्चात रॉयल लूक देतील आणि सुंदर दिसतील.
टॅग्स : गुढीपाडवाखरेदीफॅशनगुढीपाडवा 2026