Join us

मंगळागौरीसाठी साडीवर मॅचिंग हिरव्या बांगड्या हव्या? बघा स्वस्तात मस्त बांगड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2025 17:18 IST

1 / 11
मंगळागौरी, श्रावणी सोमवार अशा श्रावणातल्या वेगवेगळ्या पुजांसाठी कित्येक जणी हौशीने नटतात. छान पारंपरिक वेशभुषा करतात. अशावेळी लाल- हिरव्या रंगाचे थोडे विशेष महत्त्व असते.
2 / 11
म्हणूनच पुजेसाठी अनेकजणी लाल, हिरव्या रंगाच्या साड्या नेसतात. आता हिरव्या साडीवर मॅचिंग हिरव्या बांगड्या घ्यायच्या असतील तर बांगड्यांचे हे बघा काही खास वेगळे प्रकार..
3 / 11
अशा कित्येक प्रकारच्या वेगवेगळ्या बांगड्या बाजारात विकायला आलेल्या आहेत. या बांगड्यांमुळे तुमच्या सौंदर्याला नक्कीच चार चाँद लागतात.
4 / 11
लाखेच्या बांगड्यांचे हे एक सुंदर डिझाईन पाहा.. ज्यांना हातात खूप बांगड्यांचा खळखळाट आवडत नाही, त्यांच्यासाठी या बांगड्या छान आहेत.
5 / 11
अशा मोजक्या बांगड्या हातात घातल्या तरी हात भरून गेल्यासारखा वाटतो.
6 / 11
सध्या थ्रेड वर्क केलेल्या बांगड्यांचाही ट्रेण्ड आहे. असे अनेक सुंदर डिझाईन्स तुम्हाला थ्रेडवर्क बांगड्यांमध्ये मिळतात.
7 / 11
कुंदन, मोती, स्टोन लावून थ्रेड वर्क केलेल्या बांगड्यांना असं आणखी छान आकर्षक रूप दिलं जातं. या बांगड्या महाविद्यालयीन मुली आणि तरुण महिलांमध्ये खूप ट्रेण्डिंग आहेत.
8 / 11
वेलवेटच्या बांगड्यांनाही सध्या खूप मागणी आहे. तुम्हाला पाहिजे त्या रंगात त्या मिळू शकतात.
9 / 11
काचेच्या साध्या हिरव्या बांगड्या असतील तरी त्याच्या आजुबाजुला अशा वेगळ्या बांगड्या घालून तुम्ही बांगड्यांना अधिक आकर्षक बनवू शकता.
10 / 11
हातात खूप बांगड्या आवडत नसतील तर अशा पद्धतीचे नाजुक गोठही बाजारात मिळतात.
11 / 11
काठपदर असो किंवा डिझायनर साडी असो या बांगड्या कोणत्याही साडीवर, ड्रेसवर छानच दिसतात.
टॅग्स : खरेदीदागिनेश्रावण स्पेशलमहिला