1 / 8लग्नसराईच्या निमित्ताने जावयासाठी, मुलासाठी सोन्याचं ब्रेसलेट घेण्याचा विचार करत असाल तर कमी वजनात मिळणाऱ्या ब्रेसलेटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत...2 / 8हे ब्रेसलेट हातामध्ये अगदी शोभून दिसतात आणि त्यामुळे पुरुषांच्या हाताला एक वेगळाच लूक येतो.3 / 8अगदी रोजच्या वापरासाठीही अशा पद्धतीचे ब्रेसलेट छान आहेत.4 / 8महिलांचे कडे किंवा ब्रेसलेट असले की त्यावर जसे दोन हत्ती असतात तसंच या कड्यावर दोन वाघ आहेत. त्यामुळे याचा लूक एकदम वेगळा वाटतो.5 / 8रुद्राक्ष आणि सोनं यांचं काॅम्बिनेशन हवं असेल तर या पद्धतीचं ब्रेसलेट घेऊ शकता. 6 / 8सोन्याच्या कड्याचा लूक देणारं हे ब्रेसलेटचं हे एक साधं आणि सोबर डिझाईन पाहा. ज्यांना खूप फॅन्सी दागिने आवडत नाहीत, त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. 7 / 8हाताला भारदस्तपणा देणारं ब्रेसलेट डिझाईन पाहात असाल तर अशा पद्धतीचं ब्रेसलेट घेण्यास प्राधान्य द्या. 8 / 8अशा पद्धतीचं स्टोन लावलेलं ब्रेसलेटही सोनाराकडे मिळतं. तुम्हाला आवडत असेल आणि बजेट असेल तर एखादा हिरा लावूनही तुम्ही ब्रेसलेट घेऊ शकता.