1 / 8लग्नसराईनिमित्त एकदाणी किंवा बोरमाळसारख्या पारंपारिक दागिन्यांची खरेदी करायची असेल तर त्यात सध्या अनेक वेगवेगळे डिझाईन्स आले आहेत.2 / 8या माळांचे वैशिष्ट्य असे की त्या दिसायला खूप ठसठशीत दिसत असल्या तरी वजनाने मात्र अगदी कमी असतात.3 / 8हे मणी दिसायला भरीव वाटत असले तरी आतून पोकळ असतात किंवा काही मण्यांमध्ये लाख भरलेली असते.4 / 8त्यामुळे अगदी १ तोळ्यापेक्षाही कमी सोन्यामध्ये तुम्हाला असा सुंदर दागिना मिळू शकतो.5 / 8अशी तीनपदरी माळही खूप कमी सोन्यामध्ये तयार होते आणि शिवाय ती वजनानेही खूप हलकी असते.6 / 8हल्ली सोनं एवढं महाग झालेलं असताना सोन्याच्या दागिन्यांची हौस भागवायची असेल तर हे असे लाईटवेट दागिने हा एक उत्तम पर्याय आहे. 7 / 8जर बोरमाळेला अशा नाजूक काळ्या मण्यांची जोड दिली तर मंगळसूत्र म्हणूनही ते घालता येतात.8 / 8लग्नकार्यात घालायला असा एखादा दागिना आपल्याकडे हवाच..