१०० रुपयांत मिळवा स्मार्ट किचन, ‘या’ वस्तू अगदी स्वस्त पण स्वयंपाकघरातील कामं करतात चटचट
Updated:February 18, 2026 11:29 IST2026-02-18T11:20:19+5:302026-02-18T11:29:21+5:30
Get a smart kitchen in Rs 100, these items are very cheap but do kitchen chores quickly : झटपट कामं आटवा. घरी आणा ही स्वस्त गॅडजेट्स.

१. लसूण कटर – लसूण सोलून छोट्या तुकड्यांत पटकन कापण्यासाठी हे छोटे हँडी गॅजेट उपयोगी ठरते. सुरीने बारीक चिरण्यापेक्षा कमी वेळात आणि कमी मेहनतीत काम होते. रोजच्या फोडणीसाठी हा चांगला पर्याय आहे.
२. मिनी व्हेजिटेबल चॉपर – कांदा, टोमॅटो, मिरची किंवा कोथिंबीर बारीक चिरण्यासाठी छोटा मॅन्युअल चॉपर उपयोगी पडतो. दोरी ओढून किंवा दाब देऊन भाज्या लवकर चिरता येतात. कमी प्रमाणात भाजी चिरायची असेल तर हा उत्तम पर्याय आहे.
३. पीलर – बटाटा, गाजर, काकडी, सफरचंद यांची साल पातळ काढण्यासाठी साधा पीलर खूप सोयीचा असतो. सुरीपेक्षा सुरक्षित आणि वेळ वाचवणारा हा छोटा पण आवश्यक टूल आहे.
४. व्हिस्कर – दूध, ताक, सूप, सॉस आदी फेटण्यासाठी छोटा स्टील व्हिस्कर उपयुक्त असतो. हाताने चमच्याने फेटण्यापेक्षा मिश्रण छान मऊ आणि फेसाळ होते.
५. मोजमाप चमचे (मेझरिंग स्पून्स) – केक, बेकिंग किंवा ठराविक प्रमाणात मसाले घालण्यासाठी मोजमाप चमचे खूप उपयोगी पडतात. अंदाजाने न घालता योग्य प्रमाण मिळते.
६. लिंबू स्क्विझर – लिंबाचा रस काढताना बिया वेगळ्या राहतात आणि हाताला त्रास होत नाही. कमी मेहनतीत पूर्ण रस निघतो. सरबत किंवा सॅलडसाठी हा छोटा गॅजेट फार कामाचा आहे.
७. मल्टीपर्पज ग्रेटर – चीज, गाजर, काकडी किंवा नारळ किसण्यासाठी छोटा ग्रेटर उपयुक्त असतो. वेगवेगळ्या आकाराचे छिद्र असल्यामुळे बारीक किंवा जाड किस करता येतो.
८. किचन कात्री – पॅकेट्स कापणे, कोथिंबीर चिरणे किंवा छोटे फूड आयटम कापण्यासाठी किचन कात्रीचा वेगळा छान सेट मिळतो, उपयुक्त ठरते.