Join us   

Footwear For Rainy Season For Ladies : पावसाळी चपला खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; पाहा कमी बजेटमधले लेटेस्ट पॅटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 1:32 PM

1 / 15
पावसाचं आगमन व्हायला काही दिवसच शिल्लक आहेत. अचानक पाऊस पडल्यानंतर तुमच्या पायात साध्या उन्हाळी चपला किंवा शूज असतील तर चिखल उडून कपडे आणि चपला दोन्ही खराब होतात. पावसाळी चपला वेळेवर घालायला सुरूवात केली तर कपडे खराब होणं टाळता येऊ शकतं. या लेखात तुम्हाला पावसाळी चपलाचे काही लेटेस्ट पॅटर्न्स आणि किमती सांगणार आहोत. (Easy tips to choose the best footwear for monsoon)
2 / 15
आजकाल बाजारात वेगवेगळ्या पावसाळी चपला उपलब्ध असतात. पण कधीकधी रबरी चपला पायांसाठी त्रासदायक ठरू शकतात. म्हणून चप्पल निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पावसाळ्यात अनेकजण रबरी चपलाच वापरतात. त्या चटकन धुता येतात. त्यांचे रंग बरे असतात. त्यामुळे काही हौशी पावसाळ्यात मॅचिंग चपलाही घालतात. (Which Footwear Is Best For Monsoon)
3 / 15
२५० ते ४०० रूपयांपर्यंत तुम्हाला कुठल्याही चपलांच्या दुकानात असे पावसाळी शूज वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध होतील.
4 / 15
तुम्हाला रंगबिरंगी चपला घालायला आवडत असतील तर यात अनेक पॅटर्न्स उपलब्ध आहेत. ऑनलाईन किंवा बाजारात २५० ते ३५० रूपयांपर्यंत तुम्हाला या प्रकारच्या सॅण्डल्स, शुज मिळतील
5 / 15
जर तुम्हाला सॅण्डलपेक्षा शूज घालायला खूप आवडत असतील तर पावसाळी शूजचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ३५० ते ५५० रूपयांपर्यंत तुम्ही हवेतसे शुज विकत घेऊ शकता.
6 / 15
एंकल लेंथ जास्त असलेले, फ्लॅट हिलचे कलरफूल शूज तुम्हाला ३५० ते ६०० रूपयांपर्यंत उपलब्ध होतील.
7 / 15
३५० ते ६५० रूपयांपर्यंत तुम्हाला असे शूज विकत घेता येतील. रबरी चपला पायांत घातल्यावर त्रासदायक वाटत नाहीत पण त्यांच्या हील्सना सपोर्ट नसतो, त्यामुळे टाचांना सपोर्ट मिळत नाहीत. आणि म्हणून स्लीपरने घसरण्याचा, पाय वेडावाकडा पडण्याचा आणि चालताना पावलाला त्रास होण्याचा जितका धोका असतो. अगदी थोडं चालायचं आहे तर या चपला ठीक, पण रोज १० मिनिटांपेक्षा अधिक चालणाऱ्यांना रबरी चपला टाळाव्यात.
8 / 15
जर तुम्हाला शूज आवडत नसतील मोकळ्या चपला पायांसाठी आरामदायक ठरू शकतात २०० ते ४०० रूपयांपर्यंत तुम्हाला हव्यातश्या चपला घेता येतील.
9 / 15
पावसाळ्यातली चप्पल खरेदी पायाला आराम देईल अशी असावी फक्त स्वस्तात काम होत आहे, असं समजून स्ट्रिट शॉपिंग करू नये.
10 / 15
ज्या चपलांना मागून बंद नाहीत, अशा चपला, सॅण्डल्स वापरू नका. त्यानं पायाला ग्रिप येत नाही. तरीही ५ ते १० मिनिटं चालण्यासाठी तुम्ही ट्रान्सपरंट चपला आवडीप्रमाणे विकत घेऊ शकता.
11 / 15
जर तुम्ही रबरी ट्रेंडी चपला, शूज विकत घेतले असतील तर पायाला तेलाचा हात लावून मगच लागा नाहीतर रबराचे घर्षण होऊन त्वचा सोलली जाऊ शकते. जास्त त्रास होत असेल तर तुम्ही आधी बॅन्डेड लावून मग शूज घाला.
12 / 15
स्ट्रीट शॉपिंग न करतात तुम्ही दुकानातून ८०० ते १००० रूपयांचे शूज घेतले तर क्वालिटी चांगली मिळेल. अशा चपला पायांना चावण्याची शक्यता कमी असते.
13 / 15
पावसाळ्यात रबरी शूजमध्ये तुम्हाला ४ ते ५ वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतील. लाईट, डार्क हव्या त्या रंगाचे शूज तुम्ही विकत घेऊ शकता.
14 / 15
या प्रकारच्या चपला तुम्हाला विशिष्ट ब्रॅण्डमध्ये उपलब्ध होतील. ज्याचा फारसा त्रास जाणवणार नाही. ५०० ते ९०० रूपयांपर्यंत तुम्हाला या चपलांची शॉपिंग करू शकता.
15 / 15
(Image Credit- Social Media)
टॅग्स : पाऊसखरेदी