Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लग्नसराईसाठी घ्या खास डबल मुनिया पैठणी; १० सुंदर, आकर्षक रंग, रॉयल मराठमोळा लूक मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 13:27 IST

1 / 10
डबल मुनिया (Double Muniya Paithani) हा पैठणी साडीवरील एक लोकप्रिय आणि पारंपारीक प्रकार आहे. लग्नसमारंभाला नेसण्यासाठी या खरेदी करू शकता. (Double Muniya Paithani Designs 10 Colors)
2 / 10
मुनिया याचा अर्थ पोपट असून या डिझाईन्समध्ये दोन पोपटी नमुने एकमेकांसमोर किंवा एकामागोमाग विणलेले असतात. (Double Muniya Paithani Designs)
3 / 10
या नमुन्यांमुळे साडीच्या किनाराला विशेष आकर्षकता येते आणि ती पैठणीची अस्सल ओळख मानली जाते.
4 / 10
हा पॅटर्न पैठणी साडीवर हातमागावर अतिशय कुशलतेनं विणला जातो.
5 / 10
रंग संयोजन हे डबल मुनिया पैठणीचे वैशिष्ट्य आहे. खासकरून तपकिरी, गोल्डन ब्राऊन रंगात बॉर्डर असते.
6 / 10
तेजस्वी आणि विरोधाभासी रंग यात वापरले जातात ज्यामुळे डिझाईन्स ठळकपणे उठून दिसतात.
7 / 10
मुख्य साडीचा रंग सहसा गडद किंवा चमकिला असतो जसं की मोरपंखी, किरमिजी, पोपटी किंवा जांभळा.
8 / 10
या पैठणीत प्रामुख्यानं नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. ज्यामुळे साडीला एक शाश्वत आणि समृद्ध रूप प्राप्त होते.
9 / 10
डबल मुनिया पैठणी तिच्या बारीक आणि भरगच्च नक्षीकामामुळे खास ओळखली जाते. जी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारश्याची झकल दाखवते.
10 / 10
या साडीत पदरावर आणि काठावर पोपट आणि संपूर्ण साडीवर बुट्ट्यांची डिझाईन असते.
टॅग्स : खरेदीफॅशनसाडी नेसणे