मी बांधलं तुझ्या नावाचं डोरलं! पाहा पारंपरिक डोरलं स्टाइल मंगळसुत्रांचे ८ डिझाइन्स-सणासुदीसाठी खास दागिना
Updated:August 6, 2025 18:36 IST2025-08-06T16:03:38+5:302025-08-06T18:36:54+5:30

सणासुदीचे दिवस सुरू झालेच आहेत. त्यामुळे या दिवसांत गळ्यात घालायला जर एखादं छानसं डोरलं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर असे काही नवनविन प्रकार बाजारात आलेले आहेत..
हल्ली मंगळसुत्राला नुसतंच वाटीचं पेंडंट घेण्याऐवजी अशा पद्धतीचं पेंडंट घेतलं जातं.
डोरलं मंगळसूत्राचे अशा प्रकारचे कित्येक नवनविन पॅटर्न बाजारात पाहायला मिळत असून ते सर्वच वयोगटातल्या महिलांना आवडत आहेत, ही त्याची विशेष खासियत..
गोलाकार वाटी न घेता आता काही जणी अशी चौकोनी, त्रिकोणी आकारातली वाटीही घेतात.
वाटी असणारंच मंगळसूत्र घ्यायचं असेल तर अशी वाटी आणि त्याच्या आजुबाजुला छान वर्क असा पॅटर्नही निवडू शकता.
अशी टपोरी फुलं आणि काळे मणी जास्त असणारं मंगळसूत्रही सध्या खूप ट्रेण्डिंग आहे.
सोन्यामध्ये किंवा एक ग्रॅम वजनात तुम्ही असे मंगळसूत्र वाट्या डिझाईन्स घेऊ शकतात.
ऑनलाईन शॉपिंग साईटवरही यासारखे कित्येक मंगळसूत्र अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहेत.