Diwali 2025 : दिवाळीत पाण्यावर लावा दिवे, ना तेल वाया जाणार-ना तूप, घर उजळून जाईल प्रकाशाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:33 IST
1 / 8पाण्यावर चालणारे दिवे प्रामुख्यानं दोन प्रकारांचे असतात आणि दोन्हींची कार्य करण्याची पद्धत वेगवेगळी असते. या दिवाळीत तुम्ही सुंदर असे पाण्यावर चालणारे दिवे विकत घेऊ शकता. ( Water Sensor Diya LED Water Sensor Diya)2 / 8हे दिवे पूर्णपणे इलेक्ट्रिक असतात आणि पाणी टाकल्यावर लगेच प्रकाशित होतात. ( Water Sensor Diya )3 / 8या दिव्यांमध्ये एलईडी बल्ब, लहान बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट असते आणि दोन धातूची टोकं असतात.4 / 8पारंपारीक दिव्यांमुळे धूर होतो पण एलईडी दिवे धुरविरहीत असतात ज्यामुळे घरात स्वच्छ हवा राहते.5 / 8यामध्ये तेल किंवा तूप लागत नसल्यामुळे सांडण्याचा किंवा तेलकटपणाचा प्रश्नच येत नाही.फक्त १ चमचा पाणी घातले तरी आपोआप सुरू होतात. 6 / 8पाणी टाकल्यावर दिवा आपोआप सुरू होतो. हे तंत्रज्ञान लोकांना खूपच नवीन आणि आकर्षक वाटते.7 / 8हे दिवे पणती, कमळ, स्वास्तिक अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये असतात.8 / 8हे दिवे बॅटरीवर चालतात आणि बॅटरी कधीही बदलता येतात. त्यामुळे तुम्ही हे दिवे दरवर्षी वापरू शकता.