Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या मोत्यांचे सुंदर कानातले; ८ नव्या डिजाईन्स, सोन्यालाही लाजवतील अशा डिजाईन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 16:04 IST
1 / 8दिवाळीत साडीवर किंवा कुर्ता सेट्सवर घालण्यासाठी तुम्ही मोत्यांचे कानातले घेऊ शकता. जवळपासच्या आर्टिफिशयल ज्वेलरीच्या दुकानात किंवा ऑनलाईन शॉप्समध्ये तुम्हाला असे कानातले सहज मिळतील. (Pearl earrings for Diwali)2 / 8मोत्यांचे कानातले तुम्ही कोणत्याही रंगाच्या काठपदराच्या साडीवर घालू शकता. या कानातल्यांमध्ये बरीच व्हरायटी पाहायला मिळेल.3 / 8मोत्याचे झुमके, टॉप्स त्यावर सुंदर नक्षी असलेले कानातले तुम्हाला २०० रूपयांपासून ते ८०० रूपयांपर्यंत सहज उपलब्ध होतील.4 / 8हे कानातले घालून झाल्यानंतर लगेच प्लास्टीकच्या कागदात ठेवून डब्यात ठेवा. ज्यामुळे मॉईश्चर येऊन काळेपणा येणार नाही.5 / 8हे कानातले तुमच्या लूकला राजेशाही तितकाच पारंपारीक लूक देतील. साडी किंवा लेंहेंग्यावरही हे कानातले छान दिसतील.6 / 8आर्टिफिशयल कानातले घेताना वजनाला हलके असतील असं पाहा अन्यथा कानांवर ताण येऊ शकतो. 7 / 8अर्धचंद्राच्या आकारात मोती आणि डायमंडचे कॉम्बिनेशन असलेले कानातले तुम्हाला खूप सुंदर दिसतील.8 / 8या प्रकारच्या कानातल्यांमध्ये बाहेरच्या बाजूनं मोती लावलेले असतात. आतल्या बाजूला गुलाबी किंवा लाल मोत्यांची सजावट असते.