Join us

Diwali 2025 : दिवाळीत नेसा भरजरी मुनिया पैठणी; १० सुंदर रंग-रॉयल लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:07 IST

1 / 10
दिवाळी (Diwali 2025) हा सर्वात मोठा सण आहे. पारंपारीक, आकर्षक साडी नेसण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. त्यातील मुनिया पैठणी ही त्यातील एक खास प्रकार आहे. (Muniya Paithani Designs in 10 Colours For Diwali New Collection)
2 / 10
मुनिया पैठणीची किनार आणि पदरावर खासकरून पोपटाची नक्षी विणलेली असते. (Muniya Paithani Designs)
3 / 10
हे नक्षीकाम साडीला खास आणि आकर्षक रूप देते जे दिवाळीच्या रोषणाईत अधिक उठून दिसते.
4 / 10
जर तुम्हाला कोणाला दिवाळीत खास भेट द्यायची असेल तर मुनिया पैठणी हा एक उत्तम पर्याय आहे.
5 / 10
या प्रकारच्या पैठणीमध्ये साडीच्या किनारावर किंवा पदरावर पोपटाचे नक्षीकाम विणलेले असते.
6 / 10
ही साडी हातमागावर अतिशय कुशल कारागीर विणतात यात रेशिम आणि झरी वापरली जाते.
7 / 10
मुनिया पैठणीचे सिंगल मुनिया बॉर्डर, डबल मुनिया बॉर्डर किंवा ट्रिपल मुनिया बॉर्डर असे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. म्हणजेच एक किंवा दोन, तीन पोपटांची रांग विणलेली असते.
8 / 10
ही साडी अनेक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे जसं की पोपटी, हिरवा, लाल आणि पिवळा या रंगांचा समावेश आहे.
9 / 10
मुनिया पैठणी ही लोकप्रिय डिजाईन तिची पारंपारीकता, आकर्षकता आणि सुंदर नक्षीमुळे दिवाळीसारख्या मोठ्या सणांसाठी आवर्जून खरेदी केली जाते.
10 / 10
मुनिया पैठणीची किंमत १५०० पासून सुरू होते. १० हजार ते ४० हजारापर्यंतसु्द्धा या साड्या असतात. सेमी सिल्क, आर्ट सिल्क, कॉटन सिल्क यांसारख्या मिश्रित फॅब्रिक्सचा वापर केला जातो.
टॅग्स : दिवाळी २०२५फॅशनखरेदी