By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:41 IST
1 / 10दिवाळी (Diwali 2025) म्हटलं की खरेदी आलीच. दिवाळीसाठी नवीन साड्यांबरोबरच ज्वेलरीसुद्धा बऱ्याच महिला खरेदी करतात. सणासुधीला मोत्याचे दागिने हमखास घातले जातात.(Moti Mangalsutra Designs)2 / 10नेहमी तेच टिपिकल गोल्डन पेडंट न निवडता तुम्ही मोती पेंडंटचे मंगळसुत्र घालू शकता. पारंपारीक तितकाच मॉडर्न लूक तुम्हाला या मंगळसुत्रात मिळेल.(Latest Moti Pendant Mangalsutra Designs)3 / 10यावर तुम्हाला मॅचिंग असा कानातल्यांचा सेटसुद्धा मिळेल. कानातले आणि मंगळसुत्राचा हा कॉम्बो खूपच सुंदर दिसतो.4 / 10५०० ते २००० रूपयांपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या डिजाईन्सचे मोत्यांचे पेंडंट मिळतील.5 / 10मोत्यांच्या आजूबाजूला तुम्ही गुलाबी, लाल, हिरव्या स्टोन्सच्या डिजाईन्स निवडू शकता. तुमच्या साडीच्या रंगानुसार मंगळसुत्राची निवड करा.6 / 10आर्टिफिशियल ज्वेलरीच्या दुकानात किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्हाला हे दागिने सहज उपलब्ध होतील.7 / 10 तुम्ही लक्ष्मी मंगळसुत्रही घेऊ शकता ज्यात लक्ष्मी कोरलेली असते आणि आजूबाजूंनी मोत्यांची किनार असते.8 / 10मोत्यांचा आकार आणि गुणवत्ता यावर मंगळसुत्राची किंमत अवलंबून असते.9 / 10या मंगळसुत्रांसोबत तुम्हाला ठुशी, कानातले बांगड्या असा पूर्ण सेट सुद्धा उपलब्ध होईल.10 / 10या प्रकारचे मंगळसुत्र गेल्या अनेक महिन्यांपासून ट्रेंडीग आहेत.