Diwali 2025 : दिवाळीसाठी घ्या राजेशाही चंद्रकोर पैठणी; १० अप्रतिम रंग-मोराच्या नक्षीचं ब्लाऊज सुंदर दिसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:30 IST
1 / 10दिवाळी (Diwali 2025) हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असून या दिवशी नवीन वस्त्र परीधान करण्याची संस्कृती आहे. चंद्रकोर पैठणी निवडण्यामागे केवळ फॅशन नाही तर सांस्कृतिक सौंदर्य आणि शुभ संकल्पना दडलेली असते. (Diwali Shopping Chandrakor Paithani Collection in 10 Colours)2 / 10चंद्रकोर हे हिंदू संस्कृतीमध्ये सौंदर्य, शांती आणि देवी शक्तीचे प्रतिक मानले जाते. (Diwali Shopping Chandrakor Paithani Collection)3 / 10दिवाळीच्या रात्री चंद्रकोराचे दर्शन घेणं शुभ असते. चंद्रकोराच्या नक्षीची पैठणी नेसल्यानं घरात सकारात्मता पसरते.4 / 10ही पैठणी रेशमी आणि तिच्या भरजरी नक्षीमुळे राजेशाही लूक देते. दिवाळीच्या समारंभासाठी विशेषत: लक्ष्मीपूजन किंवा पाडव्याला तुम्ही ही साडी नेसू शकता.5 / 10ही पैठणी उत्तम दर्जाच्या रेशीमपासून बनवलेली असते ज्यामुळे तिचा पोत मऊ, मुलायम असतो.6 / 10पैठणीचा पदर सर्वात महत्वाचा असतो. चंद्रकोर पैठणीत पदरावर मोराची, पोपटाची किंवा भौमितिक नक्षी असते.7 / 10काही अधुनिक चंद्रकोर पैठण्यांमध्ये नथ पल्लू हे डिजाईन्स लोकप्रिय आहेत. जे महाराष्ट्रीनय नथीचे प्रतिक आहे.8 / 10चंद्रकोर पैठणी नऊवारी तसंच सहावारी पॅटर्नमध्येही उपलब्ध असते.9 / 10चंद्रकोर पैठणी सेमी सिल्क किंवा आर्ट सिल्कमध्ये असेल तर तुम्हाला 800 ते 1000 रूपयांत मिळेल.10 / 10सॉफ्ट सिल्क किंवा तना सिल्क असल्यास 2000 ते 8000 रूपयांपर्यंत मिळेल.