Diwali 2025 : दिवाळीसाठी ३०० रूपयांत घ्या 'फिटेड बेडशीट'; ना सरकणार- ना चुरगळणार, रॉयल लूक मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 20:30 IST
1 / 8दिवाळी (Diwali 2025) म्हटलं की खरेदी आलीच तुम्ही या दिवाळीला साध्या कॉटनच्या बेडशीट न घेता अडजस्टेबल म्हणजेच फिटेड बेडशीट घेऊ शकता. या बेडशीट तुमच्या बेडशीटला रॉयल लूक देतील आणि बेडरूमही छान दिसेल. (Buy Cotton Fitted Bedsheet For Diwali)2 / 8साध्या बेडशीटच्या तुलनेत ही बेडशीट तुमच्या गादीला व्यवस्थित फिट होते, वारंवार सरकत नाही किंवा चुरगळतही नाही. (Cotton Fitted Bedsheet New Collection)3 / 8सॅटीन फिनिशिंगची कॉटनची बेडशीट तुम्ही निवडू शकता. आरामदायक कापड असेल असं पाहा. ३०० रूपयांपासून ते ७०० रूपयांपर्यंत तुम्हाला आरामदायक बेडशीट मिळेल.4 / 8या बेडशीटच्या चारही बाजूंना इलास्टीक असते. गादीच्या खाली जाऊन कोपऱ्यांना घट्ट पकडते आणि अजिबात सरकत नाही. 5 / 8दिवाळीच्या निमित्तानं तुम्ही घरातील पडदे आणि फर्निचर यांच्याशी जुळवून बेडशीटची निवड केली तर अधिकच उठून दिसेल.6 / 8बेडशीट खरेदी करताना मशीन वॉशसाठी योग्य आहे की नाही ते तपासून पाहा.तसंच बेडशीट धुताना रंग जाणार नाही असं पाहा.7 / 8जर गादी जाड असेल तर डीप पॉकेट किंवा एस्ट्रा डीप पॉकेट बेडशीट निवडा.8 / 8बेडशीट ऑनलाईन खरेदी करत असाल तर रिटर्न पॉलिसी तपासून पाहा.