1 / 8धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अनेकजण सोन्याचांदीची खरेदी करतात. आता सोन्याचांदीच्या किमती तर प्रचंड वाढलेल्या आहेत. पण तरीही कमी वजनात होणारा सुंदर दागिना घ्यायचा असेल तर ठुशी किंवा कोल्हापुरी साज घेण्याचा विचार तुम्ही करू शकता. 2 / 8हा दागिना वजनाने कमी असतो. कारण त्याचे मणी पोकळ असतात. मण्यांमध्ये लाख भरलेली असते. त्यामुळे ठुशी कमी सोन्यामध्ये तयार होते.3 / 8हा मराठमोळा दागिना गळ्यात अगदी शोभून दिसतो. अस्सल मराठी लूक करायचा असेल तर गळ्यात छोटीशी ठुशी हवीच.4 / 8ठुशी या दागिन्यात आता खूप वेगवेगळे प्रकार मिळत आहेत.5 / 8असा हा कमी वजनाचा दागिना आपल्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत तर मिळतोच, पण तो गळ्यातही ठसठशीत दिसतो.6 / 8ठुशीमधला हा आणखी एक सुंदर प्रकार पाहा. हे डिझाईन बघताक्षणीच आवडणारं आहे.7 / 8ठुशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अगदी कमी वयाच्या मुलींपासून ते वयस्कर आजींपर्यंत सगळ्यांनाच तो शोभून दिसतो.8 / 8