डेली वेअरसाठी लाईटवेट मंगळसूत्र; १० डिझाईन्स, ऑफिस वेअर किंवा साडीवरही शोभेल मंगळसूत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 20:54 IST
1 / 10 दैनंदिन वापरासाठी १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हा आजकाल महिलांमध्ये एक अतिशय लोकप्रिय पर्याय ठरत आहे.2 / 10 १ ग्रॅमचे मंगळसूत्र खऱ्या सोन्याच्या तुलनेत अतिशय परवडणारे आणि स्वस्त असते. त्यामुळे कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही हे मंगळसूत्र घेऊ शकता.3 / 10यामध्ये तुम्हाला पारंपारीक वाटी डिझाईन्सपासून ते अधुनिक ऑफिसवेअरर्सच्या नव्या डिझाईन्स उपलब्ध होतील.4 / 10हे मंगळसूत्र वजनानं अतिशय हलके असल्यामुळे दिवसभर गळ्यात घालून ठेवले तरी कोणताही त्रास होत नाही.5 / 10प्रगत तंत्रज्ञानामुळे या दागिन्यांना हुबेहूब खऱ्या सोन्यासारखा पिवळाधमक रंग आणि चमक दिली जाते.6 / 10 प्रवासात किंवा गर्दीच्या ठिकाणी वावरताना महागडे सोने हरवण्याची भिती असते अशावेळी १ ग्रॅमचे मंगळसूत्र वापरं सुरक्षित ठरतं.7 / 10 खासकरून घरकाम, ऑफिस किंवा साध्या कार्यक्रमांसाठी डिझाईन केलेली ही मंगळसूत्र तुम्ही कुठेही वेअर करू शकता.8 / 10 याची चमक जास्त काळ टिकवण्यासाटी त्यावर पाणी,साबण किंवा परफ्यूमचा थेट संपर्क टाळणं आवश्यक असतं.9 / 10स्वस्त असल्यामुळे तुम्ही आवडीनुसार आणि फॅशनुसार वारंवार नवीन डिझाईन्स बदलू शकता.10 / 10 जर कोटींग दर्जेदार असेल तर हे मंगळसूत्र ६ महिने ते १ वर्ष आरामात टिकते.