By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:41 IST
1 / 10घरात वापरायला आरामदायक फिल येण्यासाठी कॉटनचे गाऊन्स किंवा मॅक्सी हा महिलांसाठी सर्वोत्तम पर्याय असतो. (Cotton Maxi For Daily Use)2 / 10कॉटन सुती कापड मऊ आणि हवा खेळती ठेवणारे असल्यामुळे दिवसभर घरात काम करताना किंवा रात्री झोपताना अंगाला टोचत नाही. (10 Patterns Of Cotton Maxi For Daily Use)3 / 10सुती कापड घाम शोषून घेते. त्यामुळे त्वचेला रॅशेस किंवा खाज येण्याचा धोका कमी असतो. विशेषत: उन्हाळ्यात हे अत्यंत सोयीचे ठरते.4 / 10सध्या बाजारात ए लाईन, कफ्तान स्टाईल आणि चुणीदार असे अनेक फॅशनेबल प्रकार उपलब्ध आहेत.5 / 10यामध्ये फ्लोरल प्रिंट, प्लेन कापड, राजस्थानी बांधणी आणि ब्लॉक प्रिंट्स असे सुंदर पर्याय मिळतात. जे दिसायलाही शोभून दिसतात.6 / 10 अनेक अधुनिक मॅक्सीमध्ये मोबाईल किंवा छोटी वस्तू ठेवण्यासाठी एक बाजूला खिसा दिलेला असतो जो घरकाम करताना उपयोगी ठरतो.7 / 10हे गाऊन्स शरीराला सैलसर बसतात. त्यामुळे हालचाल करण्यास पूर्ण स्वातंत्र्य मिळते.8 / 10सुती गाऊन्स धुवायला सोपे असतात आणि मशिन वॉशसाठी सुद्धा योग्य असतात. मात्र पहिल्यांदा धुताना रंग जाण्याची शक्यता असते. 9 / 10हे केवळ नाईट वेअर म्हणूनच नाही तर लाऊंज वेअर म्हणूनही दिवसभर घरात घालण्यासाठी उत्तम ठरतात.10 / 10कॉटनचे कापड धुतल्यानंतर थोडं आकसण्याचा शक्यता असते. त्यामुळे नेहमी तुमच्या मापापेक्षा एक साईज मोठी मॅक्सी घ्या.