Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात रोज वापरण्यासाठी कॉटनचे कुर्ता सेट्स; १० नवीन पॅटर्न्स-कम्फर्टेबल, कूल वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:29 IST

1 / 10
उन्हाळ्याच्या कडक उन्हात स्टायलिश आणि आरामदायी दिसण्यासाठी बंद कॉलरचे कॉटन कुर्ता सेट्स हा एक उत्तम पर्याय आहे. (Cotton Kurta Sets For Summer)
2 / 10
कॉटनमध्येही तुम्ही खादी कॉटन, लिलन-कॉटन किंवा मलमल प्रकारच्या कापडाची निवड करू शकता. हे प्रकार उन्हाळ्यात अधिक हवाशीर वाटतात. (10 New Patterns Of Cotton kurta sets)
3 / 10
उन्हाळ्यासाठी १००% सुती (Cotton) कापड अत्यंत उपयुक्त असते, कारण ते घाम शोषून घेते आणि त्वचेला थंडावा देते.
4 / 10
बंद कॉलर (Mandarin Collar) मुळे कुर्त्याला एक शिस्तबद्ध आणि 'रॉयल' लूक मिळतो, जो कोणत्याही कार्यक्रमात उठून दिसतो.
5 / 10
उन्हाळ्यासाठी पांढरा, आकाशी, हलका गुलाबी किंवा पेस्टल रंगांचे कुर्ता सेट्स डोळ्यांना थंडावा देतात.
6 / 10
हे सेट्स तुम्ही ऑफिस, घरगुती कार्यक्रम किंवा सण-समारंभासाठी सहजपणे परिधान करू शकता.
7 / 10
बंद कॉलरच्या कुर्त्यासोबत पायजमा, चुडीदार किंवा अगदी जीन्स घातल्यास एक आधुनिक 'इंडो-वेस्टर्न' लूक तयार होतो.
8 / 10
सध्या मानेभोवती आणि कॉलरवर हलकी एम्ब्रॉयडरी किंवा थ्रेड वर्क असलेले कुर्ता सेट्स खूप लोकप्रिय आहेत. सुती कुर्ते धुण्यास सोपे असतात आणि इस्त्री केल्यानंतर ते अतिशय नेटके दिसतात.
9 / 10
न्हाळ्यात या सेटसोबत कोल्हापुरी चपला आणि सनग्लासेस वापरल्यास तुमचा लूक पूर्ण आणि स्टायलिश वाटतो.
10 / 10
केवळ साधे कॉटनच नाही, तर लिनन-कॉटन किंवा खादी कॉटनचे बंद कॉलर कुर्ते उन्हाळ्यात अधिक 'प्रीमियम' आणि क्लासी दिसतात.
टॅग्स : खरेदीफॅशन