लग्नसोहळ्यासाठी घ्या खास चिंचपेटी दागिना; ८ युनिक डिजाईन्स, मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:19 IST
1 / 8चिंचपेटी (Maharashtrian Jewellery) हा महाराष्ट्रातील एक अतिशय पारंपारीक आणि खास दागिना आहे. हा गळ्यातील नेकलेस प्रकारातील दागिना आहे जो मुख्यत्वे मराठमोळ्या वेशभूषेवर परिधान केला जातो. (Chinchpeti Neckless Designs)2 / 8 याचा आकार, रचना लहान, आयताकृती किंवा चौकोनी सोन्याच्या तुकड्यांनी तयार केलेली असते. (8 Types Of Chinchpeti Neckless)3 / 8या चिंचोळ्यांवर अनेक बारीक नक्षीकाम केलेले असते आणि ते मोती किंवा रत्नांच्या सहाय्यानं अधिक आकर्षक बनवले जातात.4 / 8 या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे तो गळ्याला अगदी लागून बसतो. ज्यामुळे अतिशय देखणा आणि राजेशाही दिसतो.5 / 8सध्या फॅशनमध्ये पुन्हा एकदा पारंपारीक दागिन्यांचा ट्रेंड असल्यामुळे लग्नात, समारंभात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चिंचपेटीला मोठी मागणी असते.6 / 8अधुनिक डिझाईन्समध्ये आता ऑक्सिडाईज्ड किंवा चांदीच्या मिश्रणातील प्रकारही उपलब्ध आहेत. जे तरूणांमध्येही लोकप्रिय ठरत आहेत.7 / 8चिंचपेटी हा दागिना महाराष्ट्रीयन संस्कृती आणि सौंदर्य यांचे प्रतिक मानला जातो. लग्नकार्यात अगदी उठून दिसेल असा हा दागिना आहे.8 / 8नऊवारी, सहावारी किंवा पारंपारीक साडीच्या ड्रेसवरही तुम्ही या पॅटर्नची ठूशी घालू शकता.