Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ब्लाऊजच्या बाह्याचे १० लेटेस्ट डिझाईन्स; साध्या साडीलाही फॅन्सी लूक देईल नव्या स्टाईलचं ब्लाऊज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:42 IST

1 / 10
नवीन साडीवर तेच ते ब्लाऊज न शिवता तुम्ही नवीन पॅटर्नचे ब्लाऊज शिवू शकता. सध्या अनेक अधुनिक आणि पारंपारीक अशा दोन्ही प्रकारचे ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत. तुम्ही त्याच त्याच बाह्या न शिवता खालील नवीन पॅटर्न ट्राय करू शकता. (Blouse sleeves Designs Latest)
2 / 10
पफ किंवा बलून स्लिव्हज सध्या ट्रेंडीग असलेली फॅशन आहे. ही फॅशन पुन्हा बायकांमध्ये प्रसिद्ध होत आहे. कारण फुगा असलेल्या बाह्या अत्यंत आकर्षक दिसतात. (Top 10 Blouse Sleeves Designs)
3 / 10
वरच्या बाजूला डिझाईन्स आणि खालच्या बाजूला बॉर्डर किंवा गोंडे लावलेला हा प्रकार सिल्क साड्यांवर उठून दिसतो. (New Patterns Of Blouse Sleeves)
4 / 10
बाह्यांच्या टोकाला एकावर एक थरांच्या झालर लावल्यामुळे ब्लाऊजला डिझायनर लूक मिळतो.
5 / 10
ब्लाऊजच्या मुख्य कापडाला नेट जोडून त्यावर एम्ब्रॉयडरी किंवा मणी लावून पारदर्शक लूक दिला जातो किंवा लेस लावल्या जातात.
6 / 10
बाह्यांच्या कडेला साडीच्या रंगाचे छोटे कापडी बटण आणि लूप लावून युनिक डिझाईन तयार करता येते.
7 / 10
ब्लाऊजच्या बाह्यांवर जाळीदार डिझाईन्ससुद्धा छान दिसतात. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टोन्स लावू शकता.
8 / 10
बाह्यांवर कापडाच्या बारीक चुण्या पाडून शिवलेला हा पॅटर्न मॉडर्न साड्यांसाठी उत्तम आहे.
9 / 10
बाह्या कोपरापासून खाली पसरत जाणाऱ्या असतात ज्यामुळे एक रॉयल लूक मिळतो.
10 / 10
बाह्यांच्या मध्यभागी किंवा बाजूला आकर्षक कट देऊन त्यावर मोत्यांचे किंवा गोंड्यांचे काम केले जाते.
टॅग्स : खरेदीफॅशनस्टायलिंग टिप्स