ब्लाऊजच्या स्लिव्हजचे १० नवीन पॅटर्न्स; पफ, बलून स्लिव्हजच्या फॅन्सी डिजाईन्स, उठून दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 16:58 IST
1 / 8पफ आणि बलून स्लिव्हजचे ब्लाऊजेस (Blouse Puff Sleeves New Designs) सध्या साडी फॅशनमध्ये बरेच लोकप्रिय आहेत आणि अनेकजण ते पसंत करत आहेत. (Blouse New Patterns Puff Sleeves Balloon New Designs)2 / 8हा ट्रेंड खरंतर १९७० च्या दशकातील फॅशनचा भाग होता. जो आता अधुनिक आणि आकर्षक डिजाईन्ससह परत आला आहे.3 / 8या बाह्यांमुळे साडीला एक ग्लॅमरस आणि पार्टीवेअर लूक मिळतो. हे ब्लाऊज डिजाईन्स तुमच्या खांद्याच्या आणि हाताचा भाग अधिक उठावदार दाखवतात.4 / 8खांद्याच्या भागावर लहान किंवा मध्यम फुग्याच्या आकाराच्या पफ बाह्या असलेले ब्लाऊज पारंपारीक आणि ट्रेंडी दोन्ही लूक देतात. कोपरापर्यंत पफ बाह्या साडीवर खूप सुंदर दिसतात.5 / 8 बलून स्लिव्हज ब्लाऊजमध्ये बाह्या खांद्यापासून मनगटापर्यंत पूर्णपणे फुगीर असतात आणि मनगटाजवळ पट्टी असते.6 / 8ऑर्गेंजा, नेट, रेशिम यांसारख्या फॅब्रिकमध्ये बाह्या अधिक आकर्षक दिसतात. कारण हो फॅब्रिक्स आवश्यक असलेला फुगीर भाग चांगल्या प्रकारे टिकवून ठेवतात.7 / 8या बाह्यांचा फुगीरपणा आणि आकर्षकता टिकवण्यासाठी ब्लाऊजची फिटिंग छाती आणि कंबरपट्टीवर व्यवस्थित असावी लागते. 8 / 8हा ट्रेंडी पॅटर्न एथनिक आणि वेस्टर्नचासुद्धा टच देतो.