Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Blouse Designs 2026 : लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या स्लिव्हजचे ५० पेक्षा जास्त ट्रेंडी पॅटर्न्स; साधं ब्लाऊजही मस्त उठून दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 23:52 IST

1 / 10
लग्नसराई म्हटलं की नवनवीन साड्या आल्याच. लग्नाच्या सिजनसाठी ब्लाऊज कसं शिवायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण तेच तेच टिपिकल ब्लाऊज आता आऊटडेटेड वाटतात. (Trending Blouse Sleeves Designs)
2 / 10
ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्ही टिपिकल पॅटर्न न निवडता अधुनिक पॅटर्न निवडू शकता. ज्यात तुम्ही सुंदर दिसाल आणि लूक कमालीचा युनिक दिसेल.
3 / 10
ब्लाऊजच्या स्लिव्हजच्या एकापेक्षा एक डिझाईन्स कार्यक्रमांमध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेतील. या ब्लाऊज पॅटर्न्सच्या खास डिझाईन्स पाहूया.
4 / 10
कोपरापर्यंत असणाऱ्या या बाह्यांवर बारीक मणी आणि खड्यांचे खूप जड काम केलेले असते जे सिल्क किंवा पैठणी साड्यांवर उठून दिसतात.
5 / 10
बाह्यांच्या मधोमध चौकोनी किंवा गोलाकार कट देऊन त्याच्या कडांना स्टोनची बॉर्डर केल्यानं ब्लाऊजला अधुनिक टच मिळतो.
6 / 10
नेटच्या पारदर्शक बाह्यांवर अधूनमधून टिकल्या किंवा कुंदन लावल्यानं हातांना एक प्रकारची नाजूक चमक मिळते.
7 / 10
खांद्यापाशी फुगा असणाऱ्या बाह्यांच्या काठावर हेवी स्टोन वर्क केल्यानं पारंपारीक आणि ट्रेंडी असा फ्युजन लूक तयार होतो.
8 / 10
खांदयांचा भाग उघडा ठेवून त्या भोवती जरदोरी किंवा स्टोनचे नक्षीकाम केल्यास लग्न समारंभासाठी तो एक उत्तम पर्याय ठरतो.
9 / 10
बाह्यांवर मोराचे किंवा वेलींचे चित्र काढून त्यात पांढरे किंवा रंगीत खडे भरल्यानं ब्लाऊज अत्यंत रॉयल दिसतो.
10 / 10
बाह्यांच्या टोकाला स्टोनचे लहान लटकन लावल्यानं हातांच्या हालचालींसोबत ब्लाऊज अधिक आकर्षक लूक देते.
टॅग्स : खरेदीफॅशनस्टायलिंग टिप्स