1 / 10आजकाल ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला केवळ साध्या नॉट न लावता अतिशय कलात्मक आणि शाही पद्धतीचे डिझाईन्स बनवण्याची बरीच क्रेझ आहे. काही डिझाईन्स पाहूया. (Blouse Back Neck Dori Designs)2 / 10गळ्याच्या वरच्या भागात दोनपेक्षा जास्त दोऱ्या वापरून क्रिस क्रॉस किंवा जाळीदार विणकाम केले जाते. ज्यामुळे खांद्यावर ब्लाऊज व्यवस्थित बसतो. (Blouse Back Neck Dori And Latkan Designs)3 / 10 साध्या एका लटकनऐवजी आता वेगवेगळ्या थरांचे लटकन लावले जातात. यात मखमली धागे, मणी आणि जरीचा वापर करून झुमका स्टाईल लटकन बनवले जाते.4 / 10केवळ कापडी दोऱ्या न वापरता ब्लाऊजच्या खालच्या बाजूला मोत्यांच्या किंवा सोन्याच्या रंगाच्या दोऱ्या लावल्या जातात. 5 / 10ब्लाऊजच्या मध्यभागी एखादा मोठा कुंदनचा किंवा खड्यांचा ब्रॉच लावून तिथून लटकन सोडले जातात. जे एखाद्या कमरपट्ट्यासारखे दिसते.6 / 10गळ्याच्या कडेला स्कॅल्प किवा कटवर्कची किनार देऊन त्यावर जरदोजी किंवा मण्यांचे बारीक काम केले जाते. जे डिझाईनला अधिक उठाव देते.7 / 10पिवळ्या ब्लाऊजवर मरून किंवा राणी रंगाचे लटकन वापरल्यामुळे रंगांचा विरोधाभास निर्माण होतो जो लांबूनही उठून दिसतो.8 / 10असे हेवी बॅक डिझाईन्स प्रामुख्यानं काठपदराच्या साड्या, पैठणी किंवा लग्नातील लेहेंग्यावर अतिशय रॉयल दिसतात.9 / 10असे डिझाईन्स शिवताना टेलरला गळ्याची खोली आणि दोऱ्यांची लांबी व्यवस्थित सांगणं गरजेचं आहे. जेणेकरून ते घालताना टोचणार नाहीत आणि सुटसुटीत बसतील.10 / 10या डिझाईन्समध्ये तुम्हाला सिंपल ते हेवी वेडींग लूक बऱ्याच प्रकारच्या गळ्याचे प्रकार शिवता येतील.