Join us
Daily Top 2 Weekly Top 5

नव्या साडीच्या ब्लाऊजवर १२०० रूपयांत करा आरी वर्क; ८ डिझाईन्स, साडीत रिच लूक मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 23:11 IST

1 / 8
आरी वर्क ही एक लोकप्रिय भरतकाम कला आहे. जी बारीक सुई वापरून केली जाते. याची किंमत सामान्यत: डिझाईनचा पॅटर्न, कामाचे वेग आणि वापरलेलं साहित्य यावर अवलंबून असते.(Blouse Aari Work designs Under 1200)
2 / 8
१२०० रूपयांच्या बजेटमध्ये तुम्ही छोटे डिझाईन्स किंवा मोठे पण कमी भरतकाम असलेले नमुने निवडू शकता. कॉटन, जॉर्जेट, क्रेप यांसारख्या वस्त्रांवर केलेले आरी वर्क डिझाईन्स या बजेटमध्ये सहज उपलब्ध असतात. (Aari Work In 1200 Blouse Aari Work Designs)
3 / 8
तुम्ही केवळ गळ्याच्या भागावर किंवा बाह्यांवर भरतकाम केलेले ब्लाऊजचे नमुनेही पाहू शकता.
4 / 8
साध्या पण आकर्षक फुलांचे नमुने, पानांच्या डिझाईन्स किंवा भूमिती आकार ब्लाऊजवर उठून दिसतात.
5 / 8
तुम्हाला फार बटबटीत डिजाईन्स नको असतील तर असे वर्क ट्राय करू शकता.
6 / 8
आजकाल बुटी वर्क किंवा बेल वर्क डिझाईन्स खूप ट्रेंडमध्ये आहेत. बूटी वर्क मध्ये विखूरलेले छोटे नमूने किंवा गळ्यापासून खाली जाणारे डिझाईन्स असतात.
7 / 8
कॉन्ट्रास्ट रंगाचे किंवा मोनोक्रोमॅटीक कॉम्बिनेशन्स निवडणं बजेटमध्येही आकर्षक दिसते.
8 / 8
आरी वर्क केलेले वस्त्र शक्यतो हळूवार धुवावे किंवा ड्राय क्लिन करावे लागते. त्यामुळे त्याची पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. स्थानिक बाजारपेठा लहान बुटीक किंवा ऑनलाईन हॅण्डलूम स्टोअर्सवर तुम्हाला १२०० रूपयांत चांगले पर्याय मिळतील.
टॅग्स : खरेदीफॅशन