दिवाळीत लाडक्या लेकीसाठी करा १ ग्रॅम वजनात सोन्याच्या बिंदल्या, बघा सुंदर डिझाईन्स..
Updated:October 19, 2025 09:40 IST2025-10-19T09:35:39+5:302025-10-19T09:40:02+5:30

दिवाळीत तुमच्या घरच्या लक्ष्मीसाठी म्हणजेच तुमच्या लाडक्या लेकीसाठी एखादा नाजुक दागिना करायचा असेल तर बिंदल्या हा एक चांगला पर्याय आहे.
बिंदल्या अगदी ४ ते ५ ग्रॅम वजनाच्या सोन्यातही करता येतात किंवा त्यापेक्षा कमी वजनाच्या हव्या असतील तर बाजारात १ ग्रॅम सोन्याचं पॉलिश असणाऱ्या बिंदल्याही मिळतात.
बिंदल्या हातात घातल्या की तुमच्या लेकीचा हात बघा कसा सुंदर ठसठशीत दिसेल..
बिंदल्यांमुळे लाडक्या लेकीच्या हाताचं सौंदर्य खुलेल हे मात्र अगदी नक्की..
अशा कित्येक प्रकारच्या वेगवेगळ्या बिंदल्या बाजारात मिळतात.
असे नाजुक लटकन असणाऱ्या बिंदल्याही मिळतात. पण रोजच्या वापरासाठी घेणार असाल तर असे नाजुक डिझाईन टाळा.
मुलगी थोडी मोठी असेल तर तिच्या हातात अशा टपोऱ्या बिनल्या नक्कीच उठून दिसतील.
पाडव्याच्या मुहूर्तावर अशा बिंदल्यांची खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता.