Join us

अक्षय्य तृतीया: १ ग्रॅम सोन्यात घ्या सुंदर मंगळसूत्र ब्रेसलेट- खिशाला परवडणाऱ्या किमतीत देखणा दागिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2025 09:20 IST

1 / 8
सोन्याचे भाव सध्या खूप वाढले आहेत. त्यामुळे साेनं खरेदी करणं सध्या सर्वसामान्यांना परवडणारं नाही. पण तरीही अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हातचा सुटू द्यायचा नसेल आणि थोडी तरी सोने खरेदी करायचीच असेल तर तुम्ही १ ग्रॅममध्ये येणाऱ्या मंगळसूत्र ब्रेसलेटचा विचार करू शकता.
2 / 8
हल्ली अशा पद्धतीच्या मंगळसूत्र ब्रेसलेटची खूप फॅशन आहे. बहुतांश तरुण मुली हल्ली गळ्यात न घालता अशा पद्धतीने हातातच मंगळसूत्र ब्रेसलेट घालतात.
3 / 8
हे ब्रेसलेट खूप स्टायलिश तर दिसतेच पण जवळपास सगळ्यांच कपड्यांवर चालते.. त्यामुळे तरुणींची याला खूप पसंती मिळत आहे.
4 / 8
मंगळसूत्र ब्रेसलेटमध्ये असे कित्येक नाजूक प्रकार मिळतात. अगदी हवे तसे डिझाईन तुम्ही त्यातून घेऊ शकता.
5 / 8
कार्यक्रमांमध्ये घालायला थोडं हेवी ब्रेसलेट बघत असाल तर अशापैकी एखादं डिझाईन ट्राय करू शकता.
6 / 8
काही जणींना काळे मणी जास्त असणारं ब्रेसलेट आवडतं. त्यांच्यासाठी अशाप्रकारचे भरपूर डिझाईन्स मिळू शकतात.
7 / 8
अशा पद्धतीचं मंगळसूत्र तर तुमच्या ऑफिसवेअर कपड्यांवरही खूप स्टायलिश लूक देतं, तसंच तुम्ही ते एखाद्या पार्टीमध्येही घालून जाऊ शकता.
8 / 8
टॅग्स : खरेदीअक्षय्य तृतीयासोनंदागिनेफॅशनस्टायलिंग टिप्स