Join us
Daily Top 2 Weekly Top 5

अधिक मास विशेष : चांदीच्या जोडव्यांच्या १० नवीन-युनिक डिझाईन्स, हौसेने घ्यावा असा दागिना असं लिहायचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:10 IST

1 / 10
भारतीय संस्कृतीमध्ये अधिक मासाला (Adhik Mass 2026) अनन्य साधारण महत्व आहे. या काळात दानधर्म आणि सौभाग्यलेणी खरेदी करणं शुभं मानलं जातं. सुवासिनी या महिन्यात आवर्जून नवीन जोडवी खरेदी करतात तर कधी भेट म्हणूनही देतात. (Adhik Mass Special Silver Toe Rings Designs)
2 / 10
जुन्या काळातील मासोळी किंवा साध्या वळणाच्या जोडव्यांना आजही पंसती दिली जाते. यात आता थोडा अधुनिक टच देऊन नाजूक कोरिव काम केले जाते.
3 / 10
चांदीच्या जोडव्यांवर लाल, हिरव्या किंवा निळ्या रंगाचे मिनाकाम केलेली जोडवी दिसायला अत्यंत उठावदार आणि आकर्षक दिसतात.
4 / 10
सध्या अमेरिकन डायमंड किंवा रंगीत खडे बसवलेली जोडवी खूपच ट्रेंडमध्ये आहेत. लग्नसमारंभासाठी अशा डिझाईन्सना मोठी मागणी असते.
5 / 10
ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी किंवा कॅज्युअल वेअरसाठी ऑक्सिडाईज्ड स्लिव्हर जोडवी उत्तम ठरतात. यात प्रामुख्यानं फुला-पानांचे डिझाईन्स असतात.
6 / 10
यात दोन किंवा तीन पदर असतात जे पूर्ण बोट कव्हर करतात. हे प्रकार दिसायला अतिशय शाही वाटतात.
7 / 10
अधुनिक जोडव्यांमध्ये त्रिकोण, चौकोन किंवा कमळाच्या आकाराची नाजूक जोडवी तरूण महिलांमध्ये लोकप्रिय आहेत.
8 / 10
बोटाच्या आकारानुसार लहान-मोठी करता येणारी जोडवी सध्या सोयीस्कर मानली जातात. जेणेकरून ती कोणत्याही बोटात सहज बसतात.
9 / 10
अधिक मासाच्या निमित्तानं चांदीची जोडवी दान करणं किंवा स्वत:साठी घेणं हे चांगले मानले जाते.
10 / 10
आजकाल जोडव्यांमध्ये बरेच साधे पॅटर्न्स आले आहेत जे तुम्ही रोजच्या वापरासाठी निवडू शकता.
टॅग्स : खरेदीफॅशनदागिनेअधिक महिना