Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सिल्व्हर स्टोन नेकलेसच्या ८ डिझाईन्स; साडी असो वा ड्रेस गळ्यात उठून दिसेल सुंदर नेकलेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:16 IST

1 / 8
सध्या स्टोनचे नेकलेस महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून ते कोणत्याही साध्या लूकला रॉयल लूक देतात. (Stone Work Necklace Designs)
2 / 8
यामध्ये प्रामुख्यानं कुंदन, अमेरीकन डायमंड आणि रंगीत खड्यांचा वापर केला जातो. जे दिसायला खूपच आकर्षक दिसतात.
3 / 8
पैठणी, सिल्क किंवा नेटच्या साड्यांवर हे नेकलेस परिधान केल्यास पारंपारीक आणि मॉडर्न असा सुंदर मेळ बसतो.
4 / 8
गाऊन किंवा इंडो वेस्टर्न ड्रेसवर स्टोनचे चोकर किंवा पेंडंट असलेले नेकलेस खूपच स्टायलिश दिसतात.
5 / 8
ड्रेस किंवा साडीच्या रंगाशी सुंसंगत असे मॅचिंग खडे किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचे स्टोन निवडल्यास तुमचा लूक अधिक खुलून येतो.
6 / 8
हे नेकलेस वजनाला हलके असल्यामुळे दीर्घकाळ घालण्यासाठी सोयीस्कर ठरतात आणि त्यांची चमकही टिकून राहते.
7 / 8
सध्या मल्टी लेअर स्टोन माळा आणि मोठ्या खड्यांचे स्टेटमेंट नेकलेस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
8 / 8
जर तुमचा नेकलेस खूपच हेवी असेल तर कानतले छोटे निवडा. जेणेकरून पूर्ण लक्ष नेकलेसवर जाईल.
टॅग्स : खरेदीफॅशनब्यूटी टिप्स