By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:52 IST
1 / 11लग्नसराईमध्ये साडीचा लूक अधिक खुलून येण्यासाठी ब्लाऊजच्या डिझाईन्सना खूपच महत्व असते. विशेषत: ब्लाऊजच्या बाह्या तुम्ही कोणत्या डिझाईनच्या शिवता हे खूपच महत्वाचं असतं. (50 Latest Blouse Sleeves Designs)2 / 11२०२६ च्या लग्नसराईसाठी सध्या ट्रेण्डमध्ये असलेल्या १० ते १२ खास ब्लाऊज स्लिव्हजच्या डिजाईन्स पाहूया. (50 Trendy Blouse Sleeves Designs)3 / 11सध्या सर्वात लोकप्रिय असलेल्या ट्रेंडमध्ये कोपरापर्यंत लांबी असून छान फुगा असतो. काठ पदराच्या साड्यांवर हे अतिशय रॉयल दिसते.4 / 11ब्रायडल ब्लाऊजसाठी हे सर्वोत्तम मानले जाते. या रेशमी धागे, मणी, कुंदनचा वापर केला जातो आणि ब्लाऊजवर भरगच्च डिझाईन्स केले जातात.5 / 11जर तुम्हाला अधुनिक लूक हवा असेल तर नेटच्या बाह्या उत्तम आहे. त्यावर लहान बुट्टी किंवा नाजूक लेस लावल्यास तो लूक अधिक आकर्षक दिसतो.6 / 11फॅशनेबल आणि वेस्टर्न लूकसाठी रफल सिल्व्हज उत्तम ठरतात. यात बाहीच्या शेवटी एकावर एक थरांच्या पट्ट्या लावल्या जातात. हे इंडो वेस्टर्न साड्यांवर खूपच उठून दिसते.7 / 11बाह्यांच्या कडांना किंवा मध्ये त्रिकोणी, फुलांच्या आकाराचे कट्स देऊन त्याखाली कॉन्ट्रास्ट रंगाचे कापड लावले जाते. 8 / 11 वरच्या बाजूला फिटींग आणि कोपरापासून खाली घंटांसाराख्या परसरलेल्या बाह्या सध्या पुन्हा ट्रेंडमध्ये आहेत. हलक्या वजनाच्या साड्यांवर या डिझाईन्स छान दिसतात.9 / 11बाह्यांच्या बाजूला किंवा मध्यभागी कट देऊन तिथे सुंदर दोरी किंवा लटकन बांधले जाते. यामुळे ब्लाऊजला एक पारंपारीक पण ग्लॅमरच टच मिळतो.10 / 11हल्ली मनगटापर्यंत शिवले जाणारे ब्लाऊज पॅटर्न्स खूपच ट्रेंडला आहेत. जे तुम्हाला रॉयल लूक देतात.11 / 11लग्नसराईसाठी किंवा पुजेसाठी अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला सुंदर लूक देईल.