1 / 6गौरींसाठी किंवा महालक्ष्मींसाठी साड्यांची निवड जशी आपण चोखंदळपणे करतो, तशीच निवड त्यांच्या दागिन्यांच्या बाबतीतही व्हायला हवी. दागिने आणि साडी हे कॉम्बिनेशन परफेक्ट जुळून आलं की मग गौरी उठून दिसतात.2 / 6म्हणूनच गौरींसाठी ठसठशीत आणि भरीव दिसतील असे दागिने घ्यायला हवे. त्यात तुम्ही ३ ते ४ पदरी एकदाणी किंवा ढोलक मण्यांची माळही घेऊ शकता.(5 traditional jewellery for gauri or mahalaxmi)3 / 6दोन ते तीन पदरी मोहन माळीचा सेटही गौरींच्या अंगावर छान दिसतो. गौरींसाठी नेहमी ठसठशीत दागिने घ्यावे. नाजुक दागिने फारसे उठून दिसत नाहीत.4 / 6अशी जाडसर वज्रटीक किंवा ठुशी गौरींच्या अगदी गळ्यालगत घाला आणि त्यानंतर एकेक दागिना घाला. गळाभरून दागिने दिसतील. 5 / 6गळ्यालगत ठुशी किंवा वज्रटीक आणि त्याच्या खालोखाल एखादी मोठी माळ असं घालणार असाल तर त्या दोन्हींच्या मध्ये मोत्याचा लांब तन्मणी घाला. सोनेरी दागिन्यांमध्ये मोती उठून दिसतात.6 / 6गौरींसाठी अशा पद्धतीचा लक्ष्मीहारही नक्की घ्या. यामुळे गौराईचं रूप आणखी खुलून येतं.