Join us

२ ग्रॅम सोन्यात घ्या नाजूक, आकर्षक कानातले; १० लाईटवेट डिजाईन्स, रोज वापरायला उत्तम पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:04 IST

1 / 10
२ ग्रॅम वजनातील सोन्याचे कानातले हे रोजच्या वापरासाठी किंवा साध्या समारंभासाठी उत्तम पर्याय आहेत. या कानातल्यांच्या काही लाईट वेट आणि नवीन डिजाईन्स पाहूया. (Light Weight Gold Earrings For Women)
2 / 10
हे खूपच हलके आणि नाजूक असतात ज्यामुळे ते दिवसभर घालण्यास आरामदायक ठरतात. (Gold Earrings Designs)
3 / 10
यांचे वजन कमी असल्यामुळे ते परवडणाऱ्या श्रेणीत मोडतात. सोन्याचा सध्याचा दर आणि बनवण्यासाठी लागणारा खर्च यानुसार किंमत निश्चित होते.
4 / 10
या वजनात मुख्यत: स्टडस्,छोटे टॉप्स, सपाट सोन्याचे तुकडे किंवा बारीक साखळीचे हँगिंग्ज उपलब्ध असतात.
5 / 10
यामध्ये छोटे माती, बारीक हिरे किंवा रंगीत खडे जोडून डिझाईन्सना अधिक आकर्षकता दिली जाते.
6 / 10
हे कानातले वजन कमी असल्यामुळे कानांना त्रास देत नाहीत आणि छिद्र मोठे होण्याची किंवा त्वचा ताणली जाण्याचीही भिती नसते.
7 / 10
सहसा हे कानातले १४ कॅरेट, १८ कॅरेट किंवा २२ कॅरेटमध्ये बनवले जातात. रोजच्या वापरासाठी १८ कॅरेट किंवा १४ कॅरेट सोन्याची निवड जास्त चांगली मानली जाते. कारण ते अधिक टिकाऊ असतात.
8 / 10
कमी वजनामुळे हे कानातले मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांना भेट देण्यासाठी सोपा आणि सुंदर पर्याय ठरतात.
9 / 10
नाजूक असल्यामुळे त्यांना काळजीपूर्वक हाताळावे लागते. रोजचं काम करताना कशातही अडकणार नाही याची काळजी घ्यावी.
10 / 10
कानातल्यांच्या या डिजाईन्समध्ये तुम्हाला नवनवीन पॅटर्न्ससुद्धा बनवून मिळतील.
टॅग्स : खरेदीफॅशन