By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:30 IST
1 / 10लग्नसराईच्या खास प्रसंगांसाठी हेवी वर्क असलेल्या बॅक नेक डिझाईन्स सध्या खूपच लोकप्रिय आहेत. अशा डिझाईन्समुळे तुमच्या साडीला एक रॉयल लूक मिळतो. त्याबद्दलची माहिती समजून घेऊ. (Top 10 Back Blouse Neck designs)2 / 10हेवी वर्क ब्लाऊजमध्ये सध्या डीप व्ही नेक, राऊंड किंवा स्क्वेअर कटऐवजी ड्रॉप शेप किंवा पॉट नेक डिझाईन्सचा अधिक पसंती दिली जाते. (10 Heavy Back Neck Designs)3 / 10 ब्लाऊजच्या मागच्या बाजूला जरदोसी, रेशीम धाग्यांचे काम किंवा आरश्यांच्या वापरामुळे ब्लाऊज अत्यंत उठावदार दिसतो.4 / 10 गळ्याच्या कडांना साडी रंगाशी जुळणारे कुंदन किंवा चमकणारे खडे लावल्यानं डिझाईन्सना अधिक भव्यता मिळते.5 / 10 बॉर्डरवर मोत्यांच्या माळा किंवा लटकन लावल्यानं एक नाजूक आणि पारंपारीक टच मिळतो.6 / 10 ब्लाऊजच्या मध्यभागी एखादा मोठा भरजरी पॅच किंवा मोराची, फुलांची नक्षी बनवून त्याभोवती स्टोन वर्क केल्यानं तो अधिक आकर्षक दिसतो.7 / 10हेवी वर्कसाठी सहजा सिल्क, वेलवेट किंवा रॉ सिल्क कापडाचा वापर केला जातो. जेणेकरून वर्कचा भार कापड पेलू शकेल.8 / 10पाठीच्या दोरीला साडीच्या रंगाचे आणि हवे स्टोन वर्क असलेले मोठे लटकन जोडल्यानं मागचा लूक पूर्ण होतो.9 / 10लग्नसराईत सोन्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे ब्लाऊजवर गोल्डन मणी किंवा सोन्याच्या धाग्यांचे काम उठून दिसते.10 / 10हेवी वर्क ब्लाऊजमध्ये कॅनव्हास वापर केल्यानं गळ्याचा आकार नीट राहतो आणि डिझाईन चुरगळत नाही.