By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:51 IST
1 / 8पैंजण प्रत्येकालाच घालायला आवडतात. काहींना जाड पॅटर्न आवडते तर काहींना रोज वापरण्यासाठी नाजूक पैंजणच्या डिझाईन्स आवडतात. नाजूक पैंजणांच्या काही डिझाईन्स पाहूया. (Silver Payal Designs New Patterns)2 / 8रोजच्या वापरासाठी साधे आणि वजनाला हलके पैंजण उत्तम ठरतात, जे पायांना टोचत नाहीत आणि तुम्हाला कम्फर्टेबल लूक मिळतो. 3 / 8जर तुम्हाला थोडे भरभक्कम डिझाईन हवे असेल, तर कोल्हापुरी साज किंवा मळवट डिझाईनचे पैंजण छान दिसतात.4 / 8जास्त आवाज नको असल्यास केवळ १-२ नाजूक घुंगरू असलेले पैंजण ऑफिस किंवा कॉलेज वेअरसाठी सोयीचे असतात.5 / 8सध्या ब्लॅक मेटल किंवा 'ऑक्सिडाइज्ड' लुक खूप ट्रेंडमध्ये आहे, जे कोणत्याही कपड्यांवर उठून दिसतात.6 / 8रोज वापरायचे असल्याने साखळीची जाडी मध्यम असावी, जेणेकरून ती लवकर तुटणार नाही.7 / 8रोजच्या वापरामुळे चांदी काळी पडू नये म्हणून अधूनमधून कोरड्या कापडाने ते स्वच्छ ठेवावेत.8 / 8चांदीच्या पैंजणांच्या बारीक पट्टीच्या डिझाईन्स तुम्ही रोजच्या वापरासासाठी घालू शकता.