Join us
Daily Top 2 Weekly Top 5

१ वाटी मंगळसुत्राच्या १० डिझाईन्स; रोज वापरता येईल-ऑफिस असो की समारंभ सगळीकडे दिसेल शोभून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:39 IST

1 / 10
२ वाट्यांच्या मंगळसुत्राबरोबरच सिंगल वाटीचं मंगळसुत्रसुद्धा सध्या ट्रेंडीग आहे. या मंगळसुत्रात तुम्हाला बऱ्याच अधुनिक डिझाईन्स पाहायला मिळतील. (Latest Vati Mangalsutra Designs)
2 / 10
सिंगल वाटी मंगळसूत्र हे प्रामुख्यानं महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात परिधान केले जाणारे एक पारंपारीक आणि शुभ लेणे मानले जाते. (10 designs of 1 Vati Mangalsura)
3 / 10
यामध्ये सोन्याची एक लहान वाटी असते ती एका काळ्या मण्यांच्या सरामध्ये ओवलेली असते. (Mangalsutra Designs)
4 / 10
ही वाटी शक्ती आणि देवी पार्वतीचे प्रतिक मानली जाते. जी पतीच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी शुभ असते.
5 / 10
हे मंगळसूत्र वजनानं हलके आणि दिसायला अत्यंत नाजूक असते त्यामुळे ते दररोजच्या वापरासाठी अतिशय सोयीचे ठरते.
6 / 10
यातील काळे मणी हे वाईट नजरेपासून रक्षण करतात आणि वैवाहिक जीवनात सुख-शांत टिकवून ठेवतात अशी धारणा आहे.
7 / 10
सध्या सिंगल वाटीवर नाजूक नक्षीकाम, मीनाकारीमध्ये लहान हिरा बसवलेल्या डिझाईन्स खूपच लोकप्रिय आहेत.
8 / 10
दोन वाट्यांच्या मंगळसुत्रापेक्षा सिंगल वाटी मंगळसूत्र कमी सोन्यात तयार होत असल्यानं ते खिशाला परवडणारं असतं.
9 / 10
नोकरी करणाऱ्या महिला आणि तरूण मुलींना त्यांच्या पाश्चात्य आणि ऑफिसच्या कपड्यांवर अशा प्रकारचे साधे-सुटसुटीत मंगळसूत्र घालायला आवडतात.
10 / 10
हे मंगळसूत्र नाजूक असले तरी ते योग्य काळजी घेतल्यास जास्त टिकते आणि कोणत्याही सण-समारंभालाही शोभून दिसते.
टॅग्स : फॅशनखरेदीस्टायलिंग टिप्सदागिने