By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:02 IST
1 / 10जास्वंदाची फुलं असलेली क्रिम कलरची प्रिंटेड साडी सध्या इंस्टाग्रामवर फॅशन इन्फ्लुएन्सर्स आणि महिलांमध्ये बरीच ट्रेंडींग आहे. (10 Colors Of Jaswand Print Saree)2 / 10या साडीचा बेस हा शांत अशा क्रिम किंवा ऑफ व्हाईट रंगाचा असून त्यावर उमललेली मोठी आणि रंगबिरंगी जास्वंदाची फुलं अतिशय उठून दिसतात. यामुळे साडीला एक फ्रेश लूक येतो. (Jaswand Print Saree Colors)3 / 10ही साडी ऑर्गेन्झा सिल्क, सॉफ्ट सॅटीन मटेरिअल्समध्ये उपलब्ध आह. ज्यामुळे ती नेसल्यावर खूपच हलकी आणि स्टायलिश वाटते.4 / 10या साडीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यासोबत मिळणारे पिवळ्या रंगाचे टिकल्यांचे ब्लाऊज. पिवळा रंग आणि त्यावरचे चकाकणारे काम क्रिम साडीला एक जबरदस्त कॉन्ट्रास्ट लूक देतात.5 / 10जरी क्रिम कलर जास्त व्हायरल असला तरी यामध्ये पेस्टल पिंक, स्काय ब्लू आणि पिस्ता ग्रीन असे सुंदर रंगसुद्धा उपलब्ध असतात.6 / 10या साडीवरचा फ्लोरल प्रिंटचा पॅटर्न हा फोटोजनिक असून इंस्टाग्राम रिल्स आणि फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसतो. यामुळे अनेकजण याला पसंती देत आहेत.7 / 10 घरगुती समारंभ, हळदीचा कार्यक्रम आणि ऑफिसच्या पार्टीसाठी हा एक परफेक्ट लूक आहे.8 / 10 सध्या अनेक ऑनलाईन सेलर्स या साडीसोबत पिवंळ टिकल्याचं ब्लाऊज फ्री किंवा कॉम्बो ऑफरमध्ये देत असल्यामुळे महिलामध्ये याची खरेदी वाढली आहे9 / 10ऑनलाईन साईट्सवर ही साडी ९०० रूपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. सध्या फ्लिपकार्टवर ही साडी उपलब्ध आहे.10 / 10यात तुम्हाला काळा-पिवळा पोपटी-गुलाबी, क्रिम-पिवळा, पांढरा-गुलाबी असे ब्लाऊज आणि साडीच्या रंगाचे पर्याय मिळतील