Trending Kolhapuri Thushi : ठुशी घ्यायची? पाहा १० डिजाईन्स; गौरी गणपतीसाठी खास दागिना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:41 IST
1 / 10कोणताही सण म्हटलं की दागिने आणि साडी घेण्याचा उत्साह महिलांमध्ये दिसून येतो.(Designs Of Thushi Maharashtrian Jewellery) काठाच्या साड्यांवर किंवा कोणत्याही पारंपारीक ड्रेसचा लूक खुलवते ती म्हणजे ठूशी. ठूशी हा मराठमोळा दागिना असून मोत्यांच्या, स्टोनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ठुशी बाजारात उपलब्ध असतात. ठुशीचे काही नवीन पॅटर्न्स पाहूया. (10 Beautiful Unique Designs Of Thushi)2 / 10नववारी किंवा सहावारी काठाच्या साडीवर तुम्ही ठुशी घालू शकता. जर तुम्ही गोल्ड दागिने घालणार असाल तर ठुशीसुद्धा गोल्डन निवडा.3 / 10ठुशी हा दागिना कोल्हापूरी साज या प्रकारातील आहे. चोकर स्टाईलची ठुशी घालून तुमचा लूक अगदी खुलून येईल.4 / 10ठुशीमध्ये लाल किंवा गुलाबी खडे असतील तर कोणत्याही साडीवर ते उठून दिसतात. त्यावर शोभेल असा कानातल्यांचा सेटही तुम्हाला उपलब्ध होईल.5 / 10साधारण ३०० रूपयांपासून ते ७०० रूपयांपर्यंत तुम्हाला हे दागिने मिळतील. तुम्ही आपल्या बजेटनुसार ठुशीचं पॅटर्न निवडू शकता. 6 / 10आर्टिफिशियल ज्वेलरीच्या दुकानांमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक व्हरायटी पाहायला मिळेल.7 / 10जर ठुशीत तुम्हाला काळेमणी हवे असतील तर छान मंगळसुत्राचा लूक येईल.8 / 10मोठा नेकलेस आणि छोटी मंगळसुत्राप्रमाणे ठुशी घातली तर तुम्हाला फार दागिने न घालता मराठमोळा, आकर्षक लूक मिळेल.9 / 10पॉलिश केलेली ठुशी कोरड्या कापडात किंवा प्लास्टीकमध्ये ठेवा जेणेकरून खराब होणार नाही. हे दागिने पाण्याच्या संपर्कात येऊ देऊ नका नाहीतर रंग निघतो. 10 / 10महागली ठुशी विकत घेत असाल तर दुकानदारांकडून वॉरंटीबाबत, एक्सचेंज पॉलिसीची माहिती करून घेऊन मगच खरेदी करा.