1 / 10लग्नसराईच्या सिझनमध्ये पारंपारीक आणि तितकाच रॉयल लूक हवा असेल तर अनारकली ड्रेसेस हा एक उत्तम पर्याय आहे. अनारकली ड्रेसेसचे काही युनिक पॅटर्न्स पाहूया. (Anarkali Kurta Sets For Wome)2 / 10अनारकली ड्रेसेस त्यांच्या घेरदार रचनेमुळे अतिशय भव्य आणि रॉयल दिसतात. जे लग्नासारख्या मोठ्या समारंभांसाठी अगदी साजेसे ठरतात. (Anarkali Dresses)3 / 10सध्या मार्केटमध्ये सिल्क, जॉर्जेट, नेट आणि बनारसी अशा विविध कापडांमध्ये हे ड्रेसेस उपलब्ध आहेत. जे निवडीला भरपूर वाव देतात.4 / 10लग्नासाठी घेताना हवे एम्ब्रॉयडरी, जरदोसी वर्क किंवा मिरर वर्क असलेले ड्रेसेस अधिक उठून दिसतात.5 / 10 केवळ मुख्य लग्नासाठीच नाही तर मेहेंदी, संगीत किंवा हळदीसारख्या कार्यक्रमांसाठीही वजनानं हलके आणि फ्लोरल प्रिंटचे अनारकली ड्रेसेस घेता येतात.6 / 10अनारकलीची रचना अशी असते की सर्व प्रकारच्या शरीरयष्टीवर छान दिसतात आणि उंची जास्त असल्याचा भास निर्माण होतो.7 / 10या ड्रेसेसवर मोठे कानातले आणि गळ्यात एखादा चोकर घातल्यास तुमचा लूक पूर्ण आणि आकर्षक दिसेल.8 / 10अनारकली ड्रेसची शोभा त्याच्या दुपट्टयात असते. लग्नसराईसाठी भरगच्च नक्षीकाम असलेला हेवी वर्क दुपट्टा किंवा नेटचा नाजूक दुपट्टा घेतल्यास पेहरवा अधिक खुलून दिसतो. 9 / 10स्लिव्हजलेस, थ्री फोर स्लिव्ह, फूल स्लिव्हज असे बरेच स्लिव्हजचे पर्याय तुम्हाला यात मिळतील.10 / 10यावर तुम्ही सुंदर अशी खड्यांचे काम केलेली मोजडी घालू शकता किंवा कोल्हापूरी चप्पल छान लूक देईल.