कोण आहेत महुआ मोईत्रा आणि सध्या सोशल मीडियावर का होतीये त्यांची चर्चा?

Updated:June 6, 2025 09:59 IST2025-06-06T09:39:19+5:302025-06-06T09:59:42+5:30

Mahua Moitra : तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भारतीय राजकारणात गेल्या काही वर्षात आपली एक वेगळी छाप पाडली आहे.

कोण आहेत महुआ मोईत्रा आणि सध्या सोशल मीडियावर का होतीये त्यांची चर्चा?

Mahua Moitra : भारतातील राजकारण आणि राजकीय नेते नेहमीच लोकांच्या आवडीचा आणि सतत चर्चेत राहणारा विषय असतो. अनेक असे राजकीय नेते आहेत, ज्यांच्या भाषणांचे किंवा संसदेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत केलेल्या प्रश्नांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या काही वर्षात नेहमीच चर्चेत राहणारा असाच एक चेहरा म्हणजे महुआ मोईत्रा.

कोण आहेत महुआ मोईत्रा आणि सध्या सोशल मीडियावर का होतीये त्यांची चर्चा?

तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भारतीय राजकारणात गेल्या काही वर्षात आपली एक वेगळी छाप पाडली आहे. महुआ मोईत्रा यांनी अलिकडेच दुसरं लग्न केलं आणि त्यामुळे त्या चर्चेत आहेत. अशात या निमित्ताने त्यांच्याबाबतच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोण आहेत महुआ मोईत्रा आणि सध्या सोशल मीडियावर का होतीये त्यांची चर्चा?

महुआ मोईत्रा राजकारणात येण्याआधी अमेरिकेतील इंटरनॅशनल बॅंक जेपी मॉर्गनमध्ये काम करत होत्या. पण 2009 मध्ये त्यांनी लंडनमधील नोकरी सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. महुआ यांनी मॅसाचुसेट्सच्या माउंट होलीओक कॉलेजमधून गणित आणि अर्थशास्त्रा उच्च शिक्षण घेतलं आहे.

कोण आहेत महुआ मोईत्रा आणि सध्या सोशल मीडियावर का होतीये त्यांची चर्चा?

50 वर्षीय खासदार महुआ यांनी त्यांच्या राजकारणाची सुरूवात पश्चिम बंगालमधील कॉंग्रेसमधून केली होती. पण नंतर त्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल कॉंग्रेसमध्ये सहभागी झाल्यात. अनेक वर्ष त्या तृणमूल कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या राहिल्या.

कोण आहेत महुआ मोईत्रा आणि सध्या सोशल मीडियावर का होतीये त्यांची चर्चा?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत महुआ यांनी भारतीय जनता पक्षाच्या कल्याण चौबे यांचा तब्बल 60 हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला होता.

कोण आहेत महुआ मोईत्रा आणि सध्या सोशल मीडियावर का होतीये त्यांची चर्चा?

महुआ याचं पहिलं लग्न डेन्मार्कमधील फायनान्सर लार्स ब्रोरसन यांच्यासोबत केलं होतं. नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तीन वर्ष त्या वकील जय अनंत देहाद्रई यांच्यासोबत रिलेशनमध्ये होत्या. पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. आता महुआ यांनी बीजू जनता दलाच्या वरिष्ठ नेते आणि खासदार पिनाकी मिश्रा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

कोण आहेत महुआ मोईत्रा आणि सध्या सोशल मीडियावर का होतीये त्यांची चर्चा?

महुआ यांचं राजकीय करिअर फारच चढ-उतारानं भरलेलं आहे. 8 डिसेंबर 2023 ला त्यांना कॅश-फॉर-क्वेरी प्रकरणात आचार समितीच्या शिफारशीनंतर लोकसभेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतरही त्या 2024 मध्ये पुन्हा निवडून आल्या.

कोण आहेत महुआ मोईत्रा आणि सध्या सोशल मीडियावर का होतीये त्यांची चर्चा?

महुआ यांच्या भाषणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. लोक त्यांच्या मुद्देसूद आणि बिनधास्त बोलण्याचं नेहमीच कौतुक करत असतात. सत्ताधारी पक्षाला नेहमीच त्या धारेवर धरण्याचं काम करत असतात. अशा या राजकारणाच्या पटलावरील रणरागिणीचं लग्नाबाबत खूप अभिनंदन.