Join us   

ब्रेकअप सेक्स-हा नात्याचा कोणता नवा ट्रेण्ड? ब्रेकअपनंतरही जुन्या जोडीदारासोबत सेक्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 5:09 PM

1 / 7
ब्रेकअप सेक्स नावाचा काही प्रकार असतो हे तुम्हाला माहिती आहे का? हा एक नवीनच ट्रे्ण्ड आहे. म्हणजे प्रेमात पडून ब्रेक अप झाला तरी शरीरसंबंध कायम ठेवणे. मात्र आता या नव्या प्रकारातल्या गंभीर गोष्टींचीही चर्चा होते आहे. (What is breakup sex)
2 / 7
ब्रेकअप झाला तरी जुन्या नात्याची आठवण येते. काहीजण सेक्शुअल रिलेशन्सही ठेवतात. मात्र त्यात दोघांची संमती असते की एकाचं ब्लॅकमेलिंग, बळजबरी हे अनेकदा लक्षात येत नाही आणि समस्या निर्माण होतात. जर तुम्हालाही तुमच्या एक्सबरोबर जवळीक वाढवण्याची इच्छा असेल तर तर हा निर्णय दोघांच्या परस्पर संमतीने व्हायला हवा.
3 / 7
एका अभ्यासात ब्रेकअप सेक्ससंर्दभात काही निरिक्षणं नोंदवण्यात आली आहेत. त्यात असे दिसते की काही कपल्स ब्रेकअपच्या वेदना विसरून फक्त प्लेजरसाठी एकत्र येत. त्यापैकी काहींमध्ये नातं पुन्हा नव्याने सुरू करण्याची इच्छा होती. तर काहींना आपल्या नवीन पार्टनरबरोबर सेक्शुअली कनेक्ट व्हायला थोडा वेळ लागत होता.
4 / 7
मात्र ब्रेकअपसेक्सचे फायद्यांपेक्षा तोटे जास्त आहेत. यामुळे दोघांपैकी एकाच्या मनात खोटी आशा निर्माण होऊ शकते. ज्यामुळे लोक मुव्हऑन होऊ शकत नाहीत. याशिवाय काही वेळाच्या कंफर्टला लोक खरं प्रेम समजण्याची चूक करतात.
5 / 7
यामुळे इमोशनल डॅमेज होऊ शकतं. जुन्या गोष्टी, वेदनादायक अनुभव आठवून अनेकजण पुन्हा नैराश्यात जातात. दोघांमध्ये वादही होऊ शकतात.
6 / 7
जर तुम्ही नव्या रिलेशनशीपमध्ये असाल आणि तरी एक्ससह संबंध ठेवेल तर तुमच्या वर्तमान नात्यावर याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो.
7 / 7
ब्रेकअप सेक्स हे स्ट्रेस रिलिव्हिंगसुद्धा असू शकतं. जर तुम्ही फार ताण-तणावाखाली असाल तर यामुळे तुमचा मूड चांगला राहू शकतो.
टॅग्स : लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिप