सावधान, हे प्रेम नव्हे! नवराबायकोने एकमेकांचा टॉवेल वापरणं अत्यंत धोकादायक, होतात ५ गंभीर आजार

Updated:October 7, 2025 17:56 IST2025-10-07T17:27:36+5:302025-10-07T17:56:40+5:30

sharing towels health risks: why sharing towels is dangerous: diseases caused by sharing towels: आपल्यापैकी अनेकांना पार्टनर, मित्रांचे किंवा घरातील इतर सदस्यांचे टॉवेल वापरण्याची घाणेरडी सवय आहे. ज्यामुळे आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो

सावधान, हे प्रेम नव्हे! नवराबायकोने एकमेकांचा टॉवेल वापरणं अत्यंत धोकादायक, होतात ५ गंभीर आजार

आपण अनेकदा छोट्या छोट्या सवयींकडे दुर्लक्ष करतो पण याच सवयी कधी गंभीर आजारांना निमंत्रण देतात आपल्या लक्षात देखील येत नाही. त्यातील एक सवय म्हणजे एकमेकांचे टॉवेल वापरणे. अनेकांनी हे सामान्य वाटत असलं तरी डॉक्टर सांगतात हीच सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते. (sharing towels health risks)

सावधान, हे प्रेम नव्हे! नवराबायकोने एकमेकांचा टॉवेल वापरणं अत्यंत धोकादायक, होतात ५ गंभीर आजार

आपल्यापैकी अनेकांना पार्टनर, मित्रांचे किंवा घरातील इतर सदस्यांचे टॉवेल वापरण्याची घाणेरडी सवय आहे. ज्यामुळे आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. जाणून घेऊया कसा (why sharing towels is dangerous)

सावधान, हे प्रेम नव्हे! नवराबायकोने एकमेकांचा टॉवेल वापरणं अत्यंत धोकादायक, होतात ५ गंभीर आजार

टॉवेलमध्ये ओलावा बॅक्टेरिया, बुरशी आणि यीस्ट वाढवण्याचे काम करतो. आपण जेव्हा तो एकमेकांसोबत शेअर करतो तेव्हा त्वचेवर बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्ग पसरु शकतात. त्वचेचे इन्फेक्शन असणाऱ्यांसाठी हे धोकादायक आहे.

सावधान, हे प्रेम नव्हे! नवराबायकोने एकमेकांचा टॉवेल वापरणं अत्यंत धोकादायक, होतात ५ गंभीर आजार

टॉवेल मृत त्वचेच्या पेशी, तेल आणि घाम शोषून घेतात. ज्यामुळे जंतूंची वाढ होऊ शकते. त्वचेचे संक्रमण, पुरळ आणि इतर समस्या वाढू शकतात. त्यासाठी स्वत: चा टॉवेल वापरणं, तो नियमितपणे धुणे आणि उन्हात वाळवणे जास्त गरजेचे आहे.

सावधान, हे प्रेम नव्हे! नवराबायकोने एकमेकांचा टॉवेल वापरणं अत्यंत धोकादायक, होतात ५ गंभीर आजार

प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. जर आपण एकमेकांच्या वस्तू वापरल्या तर जळजळ, संसर्ग होऊ शकतात. यामुळे पुरळ, खाज सुटणे आणि त्वचेच्या इतर आजारांना सामोरे जावे लागू शकते.

सावधान, हे प्रेम नव्हे! नवराबायकोने एकमेकांचा टॉवेल वापरणं अत्यंत धोकादायक, होतात ५ गंभीर आजार

एकच टॉवेल वापरल्याने अनेकांकडून तो घाण होतो. ज्यामुळे जंतूंची संख्या वाढते. ओला टॉवेल २४ तासांच्या आत बॅक्टेरिया निर्माण करतात. ज्यामुळे त्वचा आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात.